प्रयागराजमधून खोक्या अटक केला त्याबद्दल चागलंच झालं. तो खोक्या असो, बोक्या असो की त्याचा आक्या असो असं म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. त्याचबरोबर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावरही त्यांनी जोरदार पलटवार केलाय. संतोष देशमुख यांची इतक्या वाईट पद्धतीची हत्या झाली तरी पंकजा मुंडे कधी त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेल्या नाहीत. आम्ही बोलत असताना त्यांनी कधी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर ब्र शब्दही काढला नाही. आता धनंजय मुंडे राजीनामा दिल्यानंतर त्या बोलायला लागल्या असा टोलाही त्यांनी लगवाला.
आष्टी विधानसभा मतदारसंघात महायुती नव्हती. आता पंकजा मुंडे यांची लेखी स्वरुपात पक्ष श्रेष्टींकडे तक्रार करणार असंही सुरेश धस म्हणाले आहेत. कारण, आमच्या भागात त्यांच्या विचारांचा माणूस निवडून नाही हे पंकजा मुंडे यांचं दु:ख आहे असा टोलाही धस यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही धस म्हणाले आहेत.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज होणार सुनावणी
स्वत:ला राष्ट्रीय सचिव म्हणायचं आणि भाजपची एकच सीट कशी म्हणता? त्यांना कसं राष्ट्रीय सचिव म्हणायचं असा प्रश्नही उपस्थित केला आहे. त्याचबरोबर सह आरोपी म्हणजे भाजीपाला आहे का काय? सोळंके, संदीप क्षीरसागर यांचे व्हिडिओ काढतात ते फक्त संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून फोकस बाजूला करण्याचं काम आहे असंही धस यावेळी म्हणाले आहेत.