11.9 C
New York

Otur : जागतिक महिला दिनी महिलांचा ” शिवजन्मभूमी शिवकन्या ” पुरस्काराने सन्मान

Published:

ओतूरOtur ,प्रतिनिधी:दि.११ मार्च ( रमेश तांबे )

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा ओतूर ता. जुन्नर येथील सांस्कृतिक भवन क्रीडासंकुल सभागृहात सन्मान करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे आयोजन स्व.वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठान ओतूर यांच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी  सुशीला गावडे, विमल डुंबरे, दुर्गा दुधवडे, मंगल दाते, शरफुन्नीसा पठाण, राजश्री भागवत जुन्नरकर, यांना अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता राहीबाई पोपेरे व सरपंच छाया तांबे यांच्या हस्ते 

शिवजन्मभूमी शिवकन्या सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच यानिमित्ताने भारताला खो खो खेळातील पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या भारतीय संघाची कर्णधार कु. प्रियंका इंगळे हिचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी ओतूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला.

   याप्रसंगी राहिबाई पोपेरे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “आजकालच्या भाज्या आणि पीके ही रासायनिक खतांचा वापर करून घेतली जातात. त्यामुळे आजार वाढतात. परंतु देशी बियाणे ही शुद्ध हवेवर आणि पाण्यावर येतात. त्यामुळे ती नैसर्गिक असतात.आपण जे खातो त्याने आपले शरीर बनते. शरीर सुदृढ असेल तर मनही सुदृढ राहील,भारतीय स्त्रियानी आपली भारतीय संस्कृती ही जपली पाहिजे. “
   यावेळी महिलांसाठी मनोरंजन म्हणून आयोजित केलेल्या सुप्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक यांच्या एकपात्री “वऱ्हाड निघाल लंडनला” या प्रयोगाने कार्यक्रमाला रंगत आणली. संदीप पाठक यांच्या सुरेख अभिनयाने सभागृहात महिलांचा हास्यकल्लोळ उडाला. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांनी हजेरी लावली. कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानच्या मेघना देशमुख, पोपट नलावडे,मंगेश डुंबरे, वैशाली घाटगे,सुशील हिंगणे, अभिनव डुंबरे, रोहिदास डुंबरे, दिपक देशमुख आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन शोभा तांबे यांनी केले.आभार रत्ना शिरसाट यांनी मानले. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img