अर्थसंकल्पातून समान्य माणसाला, कायम धावत असणाऱ्या मुंबईकरांना, लाडक्या बहिणींना, शेतकऱ्यांना काय मिळाले याची चर्चा होण्याऐवजी ‘हलाल मटन’ खरेदी करायचे की ‘झटका‘ असा नवा वाद निर्माण झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हलाल, झटका, मल्हार हे काय लावलंय महाराष्ट्रात. खाण्यावरुनही आता हिंदू – मुसलमान करण्याचा हा वाद आहे. मला सांगा तुम्ही मच्छी कशी खाणार? हलाल, हराम की मल्हार? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. ते विधिमंडळ परिसरात माध्यमांसोबत बोलत होते.मंत्री नितेश राणे राज्याचे मत्स आणि बंदर विकास यांनी हिंदू मल्हार सर्टिफिकेट असलेल्या दुकानातूनच मटन खरेदी करा, असा आदेश काढला आहे. यामुळे महाराष्ट्रात हलाल विरुद्ध झटका मटन असा नवा वाद निर्माण झाला.
यावर जितेंद्र आव्हाडांनी मराठी माणूस हा चिकत्सक आहे. बकऱ्याचे मटन घेताना तो वेगवगेळ पिसेस घेतो. हलाल मटन खायचे की झटका हे तुम्ही सांगत आहात, मच्छी पण कोणती खायची, असा सवाल करत आव्हाड म्हणाले की, मच्छी कशी कापणार? हलाल, हराम की मल्हार? काय लावलं तुम्ही? काय करणार आहात तुम्ही या देशाचं? असा खोचक सवाल त्यांनी केला.