8.3 C
New York

Mahayuti : शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजनांना अजितदादांकडून निधी नाही?

Published:

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (Mahayuti) असताना त्यांनी अनेक योजना सुरू केल्या होत्या. पण, अर्थसंकल्पात या योजनांचा उल्लेख करण्यात आला नाही. कुरघोड्यांमुळे एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला असावा, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे. ते विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Mahayuti महायुती सत्तेत आल्यावर योजना बंद

रोहित पवार म्हणाले, “एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना अनेक योजना सुरू केल्या होत्या. या योजनांचा अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे या योजना रद्द झाल्यात, असे म्हणावे लागेल. हिंदू समाजाला प्रेरित करण्यासाठी तीर्थयात्रा योजना सुरू केली होती. पण, महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर ती बंद करण्यात आली. सरकारने योजना सुरू ठेवाव्यात आणि सुरू ठेवलेल्या योजनांना निधी वाढवण्यात यावा.”

Mahayuti सरकारमधील कुरघोड्यांमुळे सामान्यांचा छळ

“तीर्थयात्रा ही योजना 60 वर्षांवरील नागरिकांसाठी सुरू केली होती. ही योजना सुरू कधी झाली आणि बंद कधी झाली, हे कळालेच नाही. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेला निधी गेला नाही. सत्ता आल्यावर योजनांचा विसर सरकारला पडला आहे. किंवा कुरघोड्यांमुळे एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतला असावा. परंतु, एकमेकांमध्ये सुरू असलेल्या कुरघोड्यांमुळे सामान्य लोकांचा झळ होत आहे,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

Mahayuti चौथ्या अर्थसंकल्पात योजना सुरू होतील

शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनीही महायुती सरकारचा समाचार घेतला आहे. “निवडणूक डोळ्यासमोर ठेवून योजना सुरू करण्यात आल्या होत्या. आता पुढील चार वर्षे निवडणूक नाहीत. चौथा अर्थसंकल्प मांडतील, तेव्हा योजना सुरू होतील,” असा टोला संजय राऊत यांनी महायुतीला लगावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img