16.9 C
New York

Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेची मोठी लाट; ‘या’ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Published:

दिवसेंदिवस राज्यात उन्हाचा तडाखा Heat Wave वाढत असून नागरिकांना उष्णतेच्या तीव्र झळा जाणवत आहेत. मार्च महिना सुरू होताच तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. (Weather) विशेषतः विदर्भातील नागपूर, अकोला, चंद्रपूर, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये तापमान ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Heat Wave विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

भारतीय हवामान विभागाने (IMD) विदर्भातील अनेक भागांत ११, १२ आणि १३ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अकोला आणि चंद्रपूरमध्ये तापमान अत्यंत जास्त राहणार असून, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी तापमान सामान्यपेक्षा ३ ते ४ अंश अधिक राहणार आहे, ज्यामुळे उन्हाळ्याचा तडाखा अधिक तीव्र जाणवेल.

फक्त विदर्भच नाही तर मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि नंदुरबार या भागांमध्येही तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईत ३७.२ अंश, ठाण्यात ३८ अंश, तर कोलाबामध्ये ३६.४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. पुण्यातही उन्हाचा प्रभाव वाढला असून, कोरेगाव पार्क येथे ३९.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. नंदुरबारमध्ये तब्बल ३९.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे खालील गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Heat Wave तडाखा कायम राहण्याची शक्यता

हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस महाराष्ट्रभर तापमान वाढत राहणार असून, विशेषतः विदर्भातील काही भागांत तापमान ४२ अंशांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. महाराष्ट्रात उन्हाची तीव्रता वाढत असताना हवामान विभागाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष न करता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांनी अधिक सावधगिरी बाळगावी.

Heat Wave उन्हाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?

शक्यतो दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान घराबाहेर पडणे टाळा.

भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा.

हलका आणि सैलसर कापड वापरा.

उन्हाच्या थेट संपर्कात येण्यापासून बचाव करा आणि छत्री किंवा टोपी वापरा.

ताजे फळे आणि पाणीदार पदार्थांचे सेवन करा.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img