11.9 C
New York

Latest News Updates : राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Published:

FIRमध्ये धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचं नाव, जुन्या प्रकरणातील FIR कॉपी व्हायरल

धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविरोधात २००७ मध्ये दाखल करण्यात आलेला एफआयआर आता व्हायरल होत आहे. संतोष कराड प्रकरणी वाल्मिक कराड अटकेत आहे. त्याच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधातील दाखल एफआयआर आता व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशिअसमध्ये दाखल, राष्ट्रीय दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित

पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशिअस दौऱ्यावर आहेत. मॉरिशिअसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमानिमित्त त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलंय. भारतीय उपखंडातील संरक्षण दलांचाही या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. भारतीय नौदलाचं जहाजसुद्धा यासाठी दाखल झालं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, 6 दुकाने जळून खाक

छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई रोडवर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. आगीत सहा दुकानं जळून खाक झाली आहेत. रहिवाशांच्या सतर्कतेमुळं जीवितहानी टळलीय. आगीचं कारणाबाबत अग्निशामक दल आणि पोलीस वेगवेगळे दावे करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मॉरिशसमध्ये बिहारी पारंपरिक पद्धतीने केले स्वागत

मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांनी उपपंतप्रधान, मुख्य न्यायाधीश, संसद सभापती, विरोधी पक्षनेते, परराष्ट्र मंत्री आणि इतर मान्यवरांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भव्य स्वागत केले

रेल्वे (संशोधन) विधेयक-2025 संसदेत मंजूर

रेल्वे (संशोधन) विधेयक-2025 संसदेत मंजूर. या विधेयकामुळे रेल्वे क्षेत्रात सुरक्षितता, आधुनिकीकरण आणि सुधारणा वेग घेणार, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img