16.9 C
New York

Otur : ओतूरच्या बाबीतमळ्यात बिबट्याची मादी जेरबंद 

Published:

ओतूर,Otur : प्रतिनिधी:दि.१० मार्च ( रमेश तांबे )

ओतूर ( ता.जुन्नर ) येथील बाबीतमळ्यात बिबट्याची मादी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी दिली.

 श्री ठोकळ म्हणाले की,ओतूर बाबीतमळा यथे बिबट्याचा वावर असल्याने,या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी येथील नागरिकांनी वनविभागाकडे केली होती.

दरम्यान या ठिकाणी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये, सोमवारी दि.१० रोजी पहाटे अंदाजे साडे सहा वाजता,तीन वर्ष वयाची बिबट्याची मादी जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या कामी ओतूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सारिका बुट्टे,वनरक्षक दादाभाऊ साबळे,वनरक्षक विश्वनाथ बेले, ऱहित लांडे,किसन केदार,गणपत केदार,फुलचंद खंडागळे, गंगाराम जाधव  हे सदर ठिकाणी तात्काळ पोहचून वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांना  भ्रणध्वनी वरून माहिती दिली त्यांच्या  मार्गदर्शनाखाली घटनास्थळी सर्व वन कर्मचारी तसेच ग्रामस्थ तुकाराम गीते, गणेश गीते, संस्कार गीते विकास गीते कुणाल गीते, पोपट मालकर, प्रदीप तांबे यांचे मदतीने  पिंजऱ्याच्या साहाय्याने सदर बिबट मादीस रेस्क्यू करून,बिबट्याच्या मादीला ताब्यात घेऊन, माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल केले. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img