भारतात गेल्या दहा वर्षांपासून ईव्हीएम घोटाळा सुरू होताच. त्यात ‘निवडणूक फोटो ओळखपत्र’ म्हणजे ‘EPIC’मध्ये घोटाळा करून भाजपा आपल्या मतांच्या दिवसाढवळ्या चोऱ्यामाऱ्या करीत आहे. पश्चिम बंगालच्या मतदार यादीत घुसवलेले लाखो मतदार याआधी झारखंड-गुजरात-बिहारसारख्या राज्यांच्या मतदार यादीतही नोंदवले आहेत आणि त्यांचा ‘EPIC’ सारखाच आहे. हा पुरावा निवडणूक आयोग आणि भाजपाची हातमिळवणी असल्याचा आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी असा थेट आरोप केला आहे.
भारतातील निवडणुका म्हणजे सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आंतरराष्ट्रीय भाषेत ‘स्कॅम’ आहे. भारताचा निवडणूक आयोगचत्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. डुप्लिकेट मतदार नोंदणीमुळे महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपा जिंकला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीआधीच हाच डुप्लिकेट मतदारांचा खेळ त्या राज्यात सुरू झाला, पण तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाची चोरी वेळीच पकडल्याने चोराच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखातून केला आहे.
बर्ड फ्लू बद्दल केंद्र सरकारने 9 राज्यांना केलं अलर्ट
निवडणूक आयोगाने 18 सप्टेंबर 2008 रोजी आपल्या वेबसाइटवरून जाहीर केले होते की, ‘EPIC’ (Electoral Photo Identity Card) नंबर हा अद्वितीय (युनिक) असेल. एकाला एकच नंबर. नंबर डुप्लिकेट असणार नाही. 15 वर्षांनंतर मग आता लाखो डुप्लिकेट (बनावट) ईपीआयसी नंबर अस्तित्वात आलेच कसे? तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी प्रश्नांचा भडिमार केल्यावर निवडणूक आयोगाची भंबेरी उडाली. प्रथमच त्यांनी ही चूक मान्य केली. डुप्लिकेट ईपीआयसी नंबर अनेकांना दिले गेले, हे स्वीकारल्यावर महाराष्ट्र, हरियाणाच्या निवडणुकांत याच माध्यमातून घोटाळा झाला आणि भाजपच्या विजयास निवडणूक आयोगानेच हातभार लावला हे सिद्ध होते, असा दावा त्यांनी केला आहे.
निवडणूक आयोगावर तृणमूल काँग्रेसचा हल्ला इतका जबरदस्त होता की, दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयोगाला भूगर्भातल्या भूकंपाचे हादरे बसले. राज्यांत दोन मतदारांचे दोन वेगळ्या ‘EPIC’ नंबर सारखे असू शकतात हा निवडणूक आयोगाचा खुलासा म्हणजे बकवास आहे. निवडणूक आयोगाचे धोरणएका मतदाराचा एक नंबर हे . मग हे डुप्लिकेट नंबरचे गौडबंगाल कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर आले? हा सर्व खेळखंडोबा निवडणूक आयोगाच्या स्वतंत्र आणि निष्पक्ष वगैरे निवडणूक घेण्याच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करतो, असेही ठाकरे यांनी नमूद केले आहे.