राज्याचा उन्हाचा तडाखा चांगलाच दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बहुतांश ठिकाणी पारा ३६ अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे. राज्यात सर्वाधिक ३८.८ तापमान सोलापूरमध्ये नोंदवले गेले आहे. राज्यात येत्या पाच दिवसांत तापमानाचा उच्चांक पहायला मिळणार आहे. तापमानाचा पारा २-४ अंशांनी वाढणार आहे. कोकण व गोवा भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत उष्णतेचा येला अलर्ट देण्यात आला आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातही ही लाट राहणार असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा,विदर्भात तापमानात वाढ झाली आहे तर कोकणात उष्णेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमान चढेच असून गेल्या 24 तासांत किमान तापमानात महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात किंचित घट झाली आहे.पुढील पाच दिवस मुंबई व उपनगर तसेच कोकणपट्ट्यात उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज ( ९ मार्च ) ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. ११ मार्च पर्यंत उष्णतेच्या लाटेचा अलर्ट असून त्यानंतर हवामान उष्म व दमट राहणार आहे.