10.6 C
New York

Raj Thackeray : गंगेचं पाणी पिण्यास ठाकरेंचा नकार ?

Published:

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन (MNS Vardhapan Din )हा चिंचवडमधल्या रामकृष्ण मोरे सभागृहात सोहळा पार पडला.या सोहळ्याला मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी खणखणीत भाषण करत संपूर्ण सोहळा गाजवला. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राजकीय लोकांचे चांगलेच कान टोचले आहेत.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, “काल मला सांगिलं कुणीतरी. मुंबई बैठक लावली होती. काही शाखाध्यक्ष आणि पदाधिकारी हजर झाले नाहीत. मग जे हजर झाले नाहीत, त्यांची हजेरी घेतली. आणि मग प्रत्येकाला विचारलं. त्यातल्या पाच-सहा जणांनी सांगितलं, साहेब कुंभला गेलो होतो. म्हटलं गधड्यानो पापं कशाला करता? ” असं वक्तव्य त्यांनी केलं .

“आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून गंगेच पाणी घेऊन आले. मी म्हटलं हड, मी नाही पिणार. पूर्वीच्या काळी ठीक होतं.पण आता सोशल मीडियावर पाहतोय. तिथे गेलेली माणसं, महिला,त्या पाण्याने काखेत वगैरे घासत होते..ते पाणी कोण पिणार ? “आताच कोरोना गेलाय, कुणाला त्याचं देणं-घेणं नाही. दोन वर्ष तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन अंघोळ करताहेत. मी असे कित्येक स्वीमिंग पूल बघितले जे उद्घाटनाला निळे होते. हळूहळू हिरवे झाले. कोण जाऊन पडेल त्यात. त्या गंगेत? त्याने तिथे काही केलंय आणि मी इथे तीर्थ प्राशन करतोय”असे राज ठाकरे म्हणाले.

अन्यथा तुझा बाबा सिद्दीकी करु…शिवसेनेच्या नेत्याला धमकीचं पत्र

“श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही. एक नदी या देशातील स्वच्छ नाही. एक नदी. आम्ही काय, नदीला माता… परदेशात अनेकदा आम्ही जातो, तिकडे स्वच्छ नद्या. ते काही तिकडे माताबिता म्हणत नाहीत. तरी नद्या स्वच्छ. आमच्याकडे सगळं प्रदूषित पाणी. कोणी अंघोळ करतंय, कोणी कपडे धुताय. काय वाटेल ते चालू आहे. या सगळ्या अंधश्रद्धा-श्रद्धेतून जरा बाहेर या सगळ्यांनी. डोकी हलवा नीट”, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img