उल्हासनगर मधील पोलीस ठाण्यात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) आणि शिवसेनेचे नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad)यांच्यात झालेला गोळीबाराचा वाद हा चांगलाच चर्चेचा होता. यावेळी गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला होता. त्या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते.या प्रकारानंतर माजी आमदार गणपत गायकवाड यांना कारागृहात देखील जावे लागले. मात्र आता शिवसेनेचे नेते महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांना धमकी मिळाल्याची बातमी समोर येत आहे. एका लग्नसमारंभात हे पत्र देवून धमकी देण्यात आली आहे.
गणपत गायकवाड आणि वैभग गायकवाडच्या नादाला लागू नकोस नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी होईल असे धमकीचे पत्र कल्याणच्या महेश गायकवाडांना आलं आहे. हे पत्र जेलमधून भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनीच पाठवलं असल्याचा महेश गायकवाडांचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
महेश गायकवाड कोण आहेत ?
या प्रकरणानंतर उल्हासनगर खूप चर्चेत होतं.मात्र आता महेश गायकवाड यांना धमकीचं पत्र मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे माजी शहराध्यक्ष आहेत. विधानसभेच्या वेळी त्यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. या आधीही त्यांना धमकी मिळाली होती.