आज सर्वत्र आनंदाचे आणि जल्लोषाचं वातावरण आहे. कारण, आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025 Final) अंतिम सामना आज भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Final) यांच्यात होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत आणि न्यूझीलंडचा सामना खेळवला जाईल. आजच्या या सामन्यात कोण जिंकणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील टीम इंडिया सर्व सामने जिंकत आहे. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेश, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला होता. यासोबतच भारताने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवले. भारतीय संघाने दुबईमध्ये चारही सामने खेळले आणि त्यात त्यांनी सहज विजय मिळवला होता.न्यूझीलंडनेही दुबईमध्ये स्पर्धेतील एक सामना खेळला आहे, त्यामुळे हे मैदान किवी खेळाडूंसाठीही नवीन नसेल.
भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Final) यांच्यातील अंतिम सामना हा आज दुपारी २.३० वाजता सुरु होईल तर नाणेफेक हे २ वाजता होईल. आजच्या या सामन्या दरम्यान, ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता असून १० टक्के ही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. दुबईत ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या सरीचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.