14 C
New York

IND vs New Zealand : भारतासमोर नवं आव्हान, डिरेल मिचेल आणि ब्रेसवेलचं अर्धशतक

Published:

आजचा रविवार हा सगळ्यांसाठी खास ठरत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना हा दुबई मध्ये खेळला जात आहे.या फायनल सामन्यात (Champions Trophy Final) भारतीय (India) फिरकी गोलंदाजांच्या जाळ्यात न्यूझीलंडचे फलंदाज अडकवले होते. परंतु फलंदाजांच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने (New Zealand) भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

न्यूझीलंडने 7 बाद 251 धावा केल्या आहेत. 41 ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या पाच बाद 174 धावा झाल्या होत्या. पण डिरेल मिचेल याने एका बाजूने डाव सांभाळत अर्धशतक झळकवत 63 धावा केल्या. तर दुसरीकडे मायकल ब्रेसवेलने(Michael Bracewell
New Zealand cricketer) शेवटी जोरदार फटकेबाजी केली.

भारतीय गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडली.कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma ) आणि विराट कोहली (Virat Kohli )या दोघांकडून क्रिकेट चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे. हा सामना कोण जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img