मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनी शनिवारी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचे सरकार अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना ज्याप्रमाणे मृत्युदंडाची शिक्षा देते त्याचप्रमाणे मुलींचे धर्मांतर करणाऱ्यांनाही मृत्युदंडाची शिक्षा देईल. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात यादव यांनी ही घोषणा केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार निष्पाप मुलींवर बलात्कार करणाऱ्यांविरुद्ध खूप कडक आहे. या संदर्भात मृत्युदंडाची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायद्यात धर्मांतरासाठी मृत्युदंडाची तरतूद देखील केली जाईल. मोहन यादव (Mohan Yadav) म्हणाले की, धार्मिक स्वातंत्र्य अधिनियमाच्या माध्यमातून आम्ही जे धर्मांतर करवतील, त्यांच्यासाठीही फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करत आहोत.
त्यांनी पुढे सांगितले की, धर्मांतर आणि गैरवर्तनाच्या कुठल्याही व्यवस्थेविरोधात सरकारने संकल्प केला आहे. आम्ही समाजामध्ये या कुप्रथांना प्रोत्साहित करणार नाही. तसेच लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्यांविरोधातही सरकारची सक्त भूमिका आहे. त्यामुळे आम्ही फाशीच्या शिक्षेची तरतूद केली आहे. आमचं सरकार जबरदस्तीने आणि फसवून दुराचार करणाऱ्यांना सोडणार नाही.
भोपाळमधील कुशाभाऊ ठाकरे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले महिला दिनाच्या या निमित्ताने मी हे देखील सांगू इच्छितो की निष्पाप मुलींसोबत होणाऱ्या गैरवर्तनाच्या बाबतीत सरकार खूप कठोर आहे. म्हणून या संदर्भात मृत्युदंडाची तरतूद करण्यात आली आहे. जो बळजबरीने किंवा आमिष दाखवून गैरवर्तन करेल. आमचे सरकार त्याला सोडणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आपण अशा लोकांना जगण्याचा अधिकार देऊ इच्छित नाही. मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि त्याच वेळी, आपल्यापैकी जे धर्मांतर करतील, विशेषतः धार्मिक स्वातंत्र्य कायद्याद्वारे. त्यांच्या फाशीची व्यवस्थाही आमचे सरकार करत आहे.त्याचबरोबर या प्रकरणावरून राजकारणही तापले आहे. काँग्रेस प्रवक्ते अवनीश बुंदेला म्हणाले कि धर्मांतराचे प्रकरण असो किंवा आदिवासी अनु.जातींवरील अत्याचार असो, सर्व प्रकरणांमध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे. या सरकारमध्ये नियम बनवले जातात, पण त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नाही. पूर्वीचे मुख्यमंत्री अशाच मोठ्या गोष्टी बोलत असत, तसेच आता हे मुख्यमंत्रीही फक्त मोठ्या गोष्टी बोलत आहेत.