राज्य सरकारने मुंबईचा (Mumbai) विकास करण्यासाठी अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू केलेत. लवकरच चौथी मुंबई स्थापन केली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) आज केलीय. त्यामुळे आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही चौथी मुंबई कशी असेल? कुठे असेल? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिलीय.
मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये मुंबईच्या विकास करण्यासाठी मोठे महत्वाचे दोन ते तीन प्रकल्प सुरुवात झाले आहेत. सवांद्रे ते वर्सोवा सी लिंक, वर्सोवा ते मढ आणि वर्सोवा पासून भाईंदरपर्यंत सिलिंक आणि मढचा सिलिंक या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मुंबईमधील जवळपास 60 टक्के ट्रॅफिक वेस्टर्नला आहे. सिलिंक सुरू झाल्यानंतर वेस्टर्न एक्सप्रेसची ट्रॅफिक डायव्हर्ट होईल, असं सांगितलं जातंय.
या प्रकल्पांमुळे वेळेत प्रचंड बचत होणार आहे. सध्या विरारला जायचं असल्यास साधार तीन ते चार तास लागतात. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे अंतर केवळ 25 मिनिटांत पार होईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही नाईन कॉनक्लेव्हमध्ये बोलताना दिली आहे.
फडणवीस म्हणाले की, राज्यातील सर्वात महत्वाचा प्रकल्प वाढवण बंदर आहे. त्यासाठी नवीन पोर्ट तयार करत आहोत, त्यामुोले मॅरिटाईम ताकद निर्माण होणार आहे. जे बंदर जेएनपीटीपेक्षा तीनपट मोठं आहे. आता जगातील सर्वात मोठं बंदर वाढवणला होणार आहे. त्यासोबतच आम्ही एक एअरपोर्ट देखील वाढवण येथे तयार करत आहेत. तिथेच बुलेट ट्रेन असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. अटल सेतूजवळ तिसरी मुंबई आहे, तर चौथी मुंबई वाढवण बंदराजवळ होणार आहे, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.