आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) शानदार कामगिरी करत या स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. भारतीय संघाने सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सने (IndvsAus) पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजायानंतर संपूर्ण देशात आनंद साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे भारताच्या या विजायानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पत्रकार परिषदेमध्ये भारताला आपल्या खेळात आणखी काही सुधारणा करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केले आहे. त्यानंतर भारतीय संघावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नाराज आहे का? असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहे.
या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाला की, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, दररोज तुम्हाला तुमच्या गेममध्ये सुधारणा करण्याची गरज असते. या गेममध्ये तुम्ही सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. असं म्हणता येणार नाही. गेममध्ये सुधारणेला नेहमीच वाव असते मग ती फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो किंवा गोलंदाजी असो. असं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना गौतम गंभीर म्हणाला. तसेच या स्पर्धेत आपल्याला आणखी एक सामना खेळायचा आहे. आशा आहे की, या सामन्यात आम्ही परिपूर्ण खेळ खेळणार. असंही तो या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाला.
याचबरोबर या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना गंभीरने भारतीय कर्णधार रोहित शर्माचे कौतुक केले. यावेळी तो म्हणाला की, आता चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना येत आहे. त्याआधी मी काय बोलू? जर तुमचा कर्णधार वेगाने आणि जबरदस्त फलंदाजी करत असेल तर ते ड्रेसिंग रूमला एक चांगला मेसेज देत आहे
तसेच या स्पर्धेत गंभीरने विराट कोहलीचा देखील कौतुक केला. यावेळी तो म्हणाला की, विराटने या सामन्यात 84 धावांची शानदार खेळी केली. जेव्हा तुम्ही 300 हून अधिक सामने खेळता तेव्हा तुम्हाला काही फिरकी गोलंदाज बाद करते. या सामन्यात त्याने 84 धावा केल्या आहेत आणि शेवटी जेव्हा तुम्ही या स्पर्धेत धावा काढता तेव्हा तुम्ही शेवटी कोणत्या ना कोणत्या गोलंदाजाच्या हाती बाद होतात.