17.4 C
New York

Dhananjay Munde : फडणवीसांचा सज्जड दम अन् धनंजय मुंडेंचा राजीनामा; वाचा मुंडेंच्या पायउतार होण्याची INSIDE स्टोरी

Published:

मस्साजोगचे सरपंच संतोश देशमुख यांच्या हत्येनंतर महायुतीतील मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर चहूबाजुंनी टिकीचे झोड उठवली जात होती. अखेर काल (दि.4) धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीसांकडे सुपुर्द केला असून, खुद्द फडणवीसांनी आपण धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असून, त्यांना कार्यमुक्त करत असल्याचे जाहीर केले आहे. पण, मुंडेंनी राजीनामा देण्यापूर्वी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या असून, देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या धमकीनंतर मुंडेंनी राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. (Dhananjay Munde Resignation Inside Story)

Dhananjay Munde फडणवीसांनी दिली होती थेट धमकी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही होते. मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात फडणवीसांनी वेळोवेळी अजित पवारांशी बोलले होते. परंतू, त्यानंतरही मुंडेंच्या राजीनाम्यावर निर्णय होत नव्हता आणि स्वतः मुंडेदेखील स्वतःहून राजीनामा देण्यास तयार नव्हे. त्यामुळे अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दम भरला असल्याची माहिती समोर आली आहे. ज्यात फडणवीसांनी तुम्ही राजीनामा देणार नसाल तर मला राज्यपालांना पत्र लिहून मंत्रिमंडळातून तुम्हाला बडतर्फ करावे लागेल असं फडणवीसांनी मुंडेंना सांगितलं. यानंतर मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वारंवार धनंजय मुंडे आणि त्यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्या नावाची चर्चा होत होती. त्यामुळे महायुती सरकारवरील दबाव वाढत होता. मुंडे अन् कराड यांची असलेली जवळीक चर्चेचा विषय राजकीय वर्तुळात होता. नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करत विरोधक वारंवार मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत होते.

बीडचा बिहार! दहा महिन्यांत 36 अन् पाच वर्षांत 276 हत्या; मुख्यमंत्र्यांनीच दिली माहिती

सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करत असताना आरोपींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची मोठी झोड उठली होती. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल अन् अजित पवार यांची अर्धा तास बैठक पार पडल्याचं समोर येतंय. या बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडे यांची कानउघडनी देखील केली, अशी माहिती समोर येतेय.

Dhananjay Munde राजीनामा म्हणजे पूर्णविराम नव्हे, राष्ट्रपतींच्या माफीनाम्यापर्यंत लढणार

धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) त्यांच्या मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश धस यांची (Suresh Dhas) प्रतिक्रिया समोर आलीय. त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुढे काय प्लॅन आहे, याबद्दल सांगितलं आहे. राजीनामा झाला यात आम्ही समाधानी आहोत. आता या प्रकरणात कोणाचा दबाव येणार नाही. सप्लिमेंटरी चार्जशिट दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर देखील कारवाई होतील.

Dhananjay Munde धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यात ट्विस्ट; ट्विट करत फोडलं नव्या वादाला तोंड

मी अजून आरोप खंडन केलेले नाहीत. 19 ऑक्टोबरला सातपुडा बंगल्यावर खंडणीसंदर्भात बैठक झाली होती. चौकशी अजून आहे. बऱ्याच जणांचा तपास, कॉल रेकॉर्डिंगचा तपास करायचा आहे. काही अधिकाऱ्यांचा देखील यात समावेश आहेत, असं देखील सुरेश धस यांनी म्हटलंय. मुंडे यांचा राजीनामा एवढंच उत्तर नाहीये. राजीनामा किरकोळ बाब असून सर्वांना फाशी झाली पाहिजे.ही लढाई संपणार नाहीये. राजीनामा राष्ट्रपतींकडे माफीनामा गेला तरी लढाई सुरूच राहणार, असंही सुरेश धस यांनी स्पष्ट केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img