कागदपत्र आणि फसवणूक प्रकरणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) (Ajit Pawar यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यावर आज (दि.5) न्यायालयाने स्थगिती दिली असून, कोकाटें बंधूंविरोधात अपील चालेपर्यंत शिक्षेला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. (Nashik District Court On Manikrao Kokate)
मस्साजोग प्रकरणावरून चहुबाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी काल (दि.4) त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज सर्वांच्या नजरा कोकाटेंना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवर काय निकाल येतो याकडे लागल्या होत्या. पण आता न्यायालयाने कोकाटेंना सुनवण्यात आलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याने अजितदादांच्या आणखी एका मंत्र्याची विकेट पडता पडता वाचली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आजच्या निकालावर कोकाटे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून होते त्यामुळे सर्वांच्याच नजरा याकडे लागल्या होत्या. शिक्षेला स्थगिती मिळाल्याने कोकाटेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
Ajit Pawar दोन वर्षांची सुनावण्यात आली होती शिक्षा
1995 साली कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केल्याप्रकरणी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने (Nashik District Sessions Court) 50 हजारांच्या दंडासह दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाने सरकारी वकील आणि कोकाटेंच्या वकिलांची बाजू ऐकून घेत या शिक्षेला स्थगिती देत निकाल राखून ठेवत 1 मार्च ही तारीख दिली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणावर निकाल देण्यासाठी 5 मार्चची तारीख दिली होती. त्यावर आज निकाल देण्यात आला आहे.
Ajit Pawar नेमक प्रकरण काय?
1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असून, कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. सुनील कोकाटे यांनी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की, आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. शासनाच्या माध्यमातून त्या सदनिका त्यांना मिळालेल्या होत्या. या संदर्भातील तक्रार मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी केलेली होती. कोकाटे हे 1995 साली आमदार होते तर, दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता.
Ajit Pawar राजकीय वैऱ्यापोटी माझ्या केस केली
नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी ते म्हणाले होते की, ही राजकीय केस होती. तुकाराम दिघोळे हे त्यावेळेस राज्यमंत्री होते. त्यांचं आणि माझं वैर होते त्या वैरापोटी त्यांनी माझ्यावर केस केली होती. त्याचा निकाल (दि.20) तीस वर्षानंतर लागल्याचे कोकाटेंनी म्हटले होते.
Ajit Pawar कोकाटे यांची राजकीय कारकिर्द कशी?
1978 – एच पी टी कॉलेजच्या जी. एस. पदी
14 ऑगस्ट 1991 – युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष
1992- जिल्हा परिषद सदस्य
1993- 1996 पंचायत समिती सभापती
1996 पासून आज तगायत 24 वर्ष नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक
जिल्हा बँकेत तीनदा चेयरमन म्हणून नियुक्ती
1997 साली पुन्हा दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य
1997 – कृषी व पशु संवर्धन सभापती नाशिक जिल्हा परिषद
1999 साली पहिल्यांदा आमदार
2994 साली सलग दुसऱ्यांदा आमदार
1 जानेवारी 2008 साली सिन्नर दूध उत्पादक संघाची स्थापना व आज तगायत संचालक व चेयरमन
2008 09- महाराष्ट्र शिखर बँक संचालक
2009 साली सलग तिसऱ्यांदा आमदार
2014 विधानसभा निवडणुकीत पराभव
2019- ला अपक्ष लोकसभा निवडणूक लढवून पराभव
2019- विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा आमदार.
सिन्नर विभागीय दूध संघाचे चेअरमन
2024- विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा आमदार म्हणून विजयी