0.5 C
New York

Devendra Fadnavis : धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Published:

संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती.

तर काही मिनिटांपूर्वी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे संपविला आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, मी स्वीकारला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच पुढील करवाईसाठी राजीनामा राज्यपालाकडे पाठवण्यात आला असल्याची देखील माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा माझ्याकडे दिला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला आहे आणि पुढील करावाई करता तो राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना मुक्त करण्यात आला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

तर दुसरीकडे 3 मार्च रोजी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर राज्यातील राजकीय घडोमोडींना वेग आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांच्यात बैठक झाली आणि या बैठकीत धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img