0.5 C
New York

Latest News Updates : राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Published:

ठाणे ते मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीचा वाहनधारकांना फटका

सकाळीपासून ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. मुलुंड येथून ठाण्याच्या दिशेने येत असतानाच मेट्रोचे काम सुरू असतानाच सिग्नल बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावर भांडुप ते विक्रोळी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी

पूर्व द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहिनीवर भांडुप ते विक्रोळी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सुमारे दीड ते दोन किमी वाहनांचा रांगा पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीचे कारण अस्पष्ट आहे. मात्र यामुळे कामासाठी मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्याना अर्धा ते एक तास इथे खोळंबा होताना पाहायला मिळतो आहे. या मार्गावर पहाटे पाच वाजताच्या दरम्यान एक रेती वाहून नेणारा डंपर , कचरा वाहून नेणाऱ्या क्लीन अप ट्रक ला धडकला. यामुळे हा ट्रक रस्त्यात उलटला.यात रामावतार प्रजापती या ट्रक चालकाचा मृत्यू झाला.वाहतूक पोलिसांनी ही अपघात ग्रस्त वाहने रस्त्यातून बाजूला केली असली तरी यामुळे झालेली वाहतूक कोंडी वाढत गेली आणि ती अजून ही पूर्व द्रुतगती मार्गावर पाहायला मिळत आहे.

लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त सरकारकडून मोठं गिफ्ट, फेब्रुवारी आणि मार्चचे हफ्ते ८ तारखेला मिळणार

लाडक्या बहिणींना महिला दिनानिमित्त सरकारकडून मोठं गिफ्ट, फेब्रुवारी आणि मार्चचे हफ्ते ८ तारखेला मिळणार

राज ठाकरे घेणार फडणवीसांची भेट

राज ठाकरे फडणवीसांची भेट घेणार अशी माहिती आहे.

मुंबई -आग्रा महामार्गावर पाण्याची पाईपलाईन फुटली, भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया

धुळे –

मुंबई -आग्रा महामार्गावर पाण्याची पाईपलाईन फुटल्याने भर उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी सर्रासपणे वाया

तापी जलवाहिनी फुटल्याने उंचच उंच पाण्याचे उरले कारंजे

लाखो लिटर पाणी पाईप लाईन फुटल्याने वाया गेल्याने नागरिकांचा संताप

परिसरात व रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी

शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा परिसरात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया..

कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, विविध संघटनांची मागणी प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

इतिहासातील सन्मानजनक आणि सर्वांचे प्रेरणास्थान असलेल्या महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नागपूर येथील शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला कठोर शासन करावे, अशी मागणी अहिल्यानगर येथील अखंड मराठा समाज, जिजाऊ ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

नागपुर येथील प्रशांत कोरटकर या विक्षिप्त इसमाने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणात राजमाता जिजाऊ, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अतिशय हिन दर्जाचे अवमानकारक तथ्यहीन वक्तव्य केलेले आहे.

त्यामुळे शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करुन त्यास तात्काळ कठोर शासन करावे आणि त्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात चालवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला दुपारी कोर्टात हजर करणार

पुणे पोलिसांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला मध्यारात्री शिरुरमधील गुनाट गावातून अटक केली असून त्याला आज दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img