गेली तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते. त्यांचा राजकीय वरदहस्त असल्याने हे घडलं असा थेट आरोप होत होते. (Dhananjay Munde) त्यासोबतच मुंडे यांचा राजीनामा घ्या अशीही मागणी होत होती. मात्र, मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी टाळाटाळ केली. राजीनामा घेतला नाही. दरम्यान काल संतोष देशमुख यांना कसं मारलं याचे फोटो समोर आले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र पेटला. त्यानंतर अखेर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
धनंजय मुंडे यांचे पीए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आहेत. त्यांच्याकडे राजीनाम्याचं पत्रही आहे. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. पीए राजीनाम्याचं पत्र घेऊन गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला आहे. दरम्यान, यावेळी माध्यमांनी अजित पवार यांना विचारलं असता ते रागावल्याचं दिसलं.