धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राजीनामा व्हायला उशीर झाला याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत (Munde ) असा हल्लाबोल त्यांनी केला. संतोष देशमुख हिंदू नव्हते का? ते तर भाजपचे कार्यकर्ते होते. 130 आमदार असून देखील सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, हे दुर्दैव आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
जर भाजपच्या कार्यकर्त्याला न्याय मिळत नसेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी कसे काम करतील? या राज्यात कुणीच सुरक्षित नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याला वेळ लागला याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत असा त्यामुळे हे सरकारच बरखास्त केले पाहिजे असे म्हणाले.
मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता इथे महिलाच सुरक्षित नाहीत. राज्यात काही आलबेल नाही. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा झाला तर राज्यात काही तरी चांगले होईल असे वाटते असे आदित्य ठाकरे म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची घोषणा, सदनात व्हायला हवी , ती बाहेर करण्यात आली हे देखील उल्लंघन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. असाही हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. तसंच, सपाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले आहे. पण आता केंद्रातही आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे. मग त्यांच्यावर काय कारवाई करणार असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.