-4.3 C
New York

Raksha Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड; पाच टवाळखोरांवर गुन्हा दाखल

Published:

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही टवाळखोरांनी मुक्ताईनगर येथील यात्रोत्सवात चक्क केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली. या प्रकरणी मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे टवाळखोरांवर गुन्हा दाखल केला आहे. राज्यात महिला आणि मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्या आहेत. अशातच ही घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे यात्रा सुरू आहे. या यात्रेत रक्षा खडसे यांची मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत गेली होती. या यात्रेत गर्दी होती. काही टवाळखोर मुलेही होती. त्यांनी भर यात्रेत रक्षा खडसे यांची मुलीची छेड काढली. येथील सुरक्षारक्षकांनी या मुलांना रोखण्याचा प्रयत्न केला मात्र या मुलांनी सुरक्षारक्षकांनाही जुमानले नाही. त्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी रक्षा खडसे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेनंतर सुरक्षारक्षकांनी पोलीस स्टेशन गाठले. त्यांच्या मागे रक्षा खडसेही पोहोचल्या. त्यांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. मुलींची छेड काढणाऱ्या या आरोपींना अटक झालीच पाहिजे असा पवित्रा त्यांनी घेतला. पोलिसांनी लागलीच तक्रार दाखल करून घेत टवाळखोरांचा शोध सुरू केला. मुक्ताईनगर मतदारसंघात गुन्हेगारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. अवैध धंद्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की आज एका मंत्र्याची खासदाराची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य मुलींचे काय याबाबत मी मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे. कायदे आहेत पण राज्य सरकारकडे मागणी करेल की अशा प्रवृत्तीच्या लोकांना पायबंद घालण्यासाठी कठोरात कठोर कारवाई केली गेली पाहिजे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img