-4.3 C
New York

Sanjay Raut : ‘मोहन भागवत कुंभला का गेले नाहीत, हा प्रश्न शिंदेंनी विचारावा’, संजय राऊतांचे चॅलेंज

Published:

स्वत:ला हिंदू रक्षक समजणारे लोक कुंभला गेले नाहीत, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. पण, आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. सरसंघचालक मोहन भागवत कुंभला का गेले नाहीत? हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारावा, असे चॅलेंज संजय राऊत यांनी दिले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Sanjay Raut कुंभला गेल्याने हिंदुत्त्व बळकट होत नाही

संजय राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदेंना अमित शहा किंवा भाजपने व्यवस्थित बोलायला शिकवायला पाहिजे. एकनाथ शिंदे भ्रष्ट मंत्री आणि आमदारांना घेऊन प्रयागराजला गेले होते. कोणता साबण वापरला माहिती नाही. कुंभला गेल्याने हिंदुत्त्व बळकट होते, असे आम्हाला वाटत नाही. उद्धव ठाकरे हे कुंभला न गेल्यानं त्यांच्या हिंदुत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असाल, तर हाच प्रश्न एकनाथ शिंदे यांनी मोहन भागवत यांनाही विचारला पाहिजे.”

Sanjay Raut आम्ही भागवंतांना फॉलो करतो

“संघाच्या मोठ्या नेत्यांना मी कुंभमेळ्यात गेल्याचे पाहिले नाही. अशाप्रकारे पुण्य मिळत असेल, यावर संघातील लोकांचा विश्वास नसावा. आम्ही मोहन भागवत यांना फॉलो करतो. मोहन भागवत कुंभला गेल्यानंतर आपण शाहीस्नान करायचे, असे ठरले होते. पण, मोहन भागवतच कुंभला गेले नाहीत. बाकी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे आम्ही जायचे का? आमच्यासाठी मोहन भागवत हे आदर्श पुरूष आहेत,” अशी टोलेबाजी राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut भागवत कुंभला न गेल्याने आम्हीही गेलो नाही

“हेडगेवार, गोळवळकर गुरूजी, बाळासाहेब देवरस, रज्जू भैय्या हे कुंभत सहभागी झाल्याचे फोटो आढळून आले नाहीत. कशाप्रकारचे कुंभत सहभागी व्हावे म्हणून मी जुना इतिहास चाळत होतो. मात्र, मला काहीच सापडले नाही. मोहन भागवत सहभागी न झाल्याने आम्हीही कुंभला गेलो नाही, हे माजी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छतो. आम्हाला प्रश्न विचारण्याआधी एकनाथ शिंदेंनी नागपुरात जाऊन पत्रकार परिषद घ्यावी आणि मोहन भागवत यांना प्रश्न विचारावा,” असे आव्हान राऊत यांनी दिले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img