-4.3 C
New York

Dhananjay Munde : अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला? करूणा मुंडेंचा मोठा दावा

Published:

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचे ‘सीआयडी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी वाल्मिक कराड हा आपला निकटवर्तीय असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यातच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे, असा दावा करूणा मुंडे शर्मा यांनी केला आहे.

Dhananjay Munde मुंडेंची मागणी पूर्ण करावी…

एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना करूणा मुंडे शर्मा म्हणाल्या, “दोन दिवसांआधी अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला आहे, अशी माहिती मिळाली. ‘संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो कुणी दोषी असेल, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे,’ असं धनंजय मुंडे म्हणत होते. आता ही मागणी पूर्ण करावी.”

Dhananjay Munde 100 टक्के राजीनामा होणार

“मी राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून धनंजय मुंडेंना मंत्रिपदाची शपथ देऊ नये, अशी मागणी केली होती. पण, आता धनंजय मुंडेंचा 100 टक्के राजीनामा होणार आहे. जरी राजीनामा झाला नाही, तर मी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. मी तीन वर्षापासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहे,” असे करूणा मुंडे शर्मा यांनी सांगितले.

Dhananjay Munde कराडला वाचवण्यासाठी मुंडेंचे प्रयत्न

यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाच पाहिजे. राजीनामा दिला नाही, तर बडतर्फ केले पाहिजे. खंडणी आणि हत्येचा गुन्हा वेगवेगळा नोंदवला गेला. हे सगळे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंनी केलेला प्रयत्न होता. संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींना फाशी होण्यासाठी मुंडेंचा राजीनामा होणे गरजेचे आहे,” असे अंजली दमानिया यांनी म्हटले.

Dhananjay Munde राजीनामा न घेतल्यास भूमिका स्पष्ट करणार

“अधिवेशनाआधी मुंडेंचा राजीनामा घेतला गेला नाही, तर मी माझी भूमिका स्पष्ट करेल,” असेही दमानिया यांनी सांगितले.

Dhananjay Munde करूणा मुंडेंची पोस्ट चर्चेत…

दरम्यान, करूणा मुंडे-शर्मा यांनी एक फेसबूक पोस्ट केले होती. त्यातून मुंडेंच्या राजीनाम्याची चर्चा झाली आहे. “03-3-2025 को राजीनामा होगा #karunadhananjaymunde” असे फेसबूक पोस्टमध्ये करूणा मुंडे-शर्मा यांनी म्हटले आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला का? हे सोमवारी स्पष्ट होईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img