महाराष्ट्रातून थंडी गायब झाली आहे. उष्णतेच्या झळांनी (Heat Wave) नागरिक हैराण झाले आहेत. हवामान विभागाने उत्तरेकडील राज्यांना पावासाचा इशारा दिला आहे. चक्रकार वाऱ्यांची स्थिती सध्या उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या परिसरातसह मध्य महाराष्ट्राच्या मध्यभागात आहे. त्यामुळे राज्यात कोकण आणि गोवा परिसरात दोन दिवसात प्रचंड उष्ण आणि दमट वातावरण असेल, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी तापमान वाढलेलेच राहिणार आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
मुंबईत शनिवारी ( 1 मार्च ) कमाल तापमान 35.5 अंश एवढे होते. दक्षिण आणि उत्तर कोकणात 31-36 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात 34-35 अंश तापमानाची नोंद झाले आहे. मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या झळा वाढल्या असून 35 ते 36 अंशापर्यंत बहुतांश ठिकाणी तापमान नोंदवले आहे. पुणे, सोलापूर आणि साताऱ्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे.
Heat Wave पुढील पाच दिवस कसे असेल तापमान?
कोकण आणि मुंबईला उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात सर्वाधिक उष्णता जाणवेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील हवामानात फारसा बदल नाही, असे हवामान विभागाने सांगितले आहे.