7.9 C
New York

Ajit Pawar : स्वारगेटवरील ‘खळ्ळखट्याक’ वसंत मोरेंच्या अंगलट येणार?; अजितदादांनी दिले संकेत

Published:

स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरूणीवर बलात्काराच्या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी स्थानकावर दाखल होत सुरक्षा केबिनची तोडफोड केली होती. त्यांच्या या तोडफोडीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वसंत मोरे (Vasant More) यांना फोन करून त्यांचं आणि सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र, आता केलेलं हे खळ्ळखट्याक वसंत मोरेंसह पक्षाच्या अंगलट येण्याची शक्यता असून, पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) यांनी यावर कारवाई करण्याचे संकेत देत इशारा दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

Ajit Pawar राग सर्वांना येतो पण…

स्वारगेट येथील घटनेनंतर वसंत मोरेंनी स्थानकात जाऊन तोडफोड केली. त्याबाबत अजितदादांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, पूर्ण तपास होऊन सत्यता पुढे येऊ द्या. एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तोडफोड करत असाल तर, स्वतःला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कोणी करत असेल तर तो पक्ष किंवा त्या कार्यकर्त्याकडून वसूल केला पाहिजे असं कोर्टाने सांगितलं आहे.

राग व्यक्त करण्याच्या काही गोष्टी असू शकतात. पण, काही अतिउत्साही कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय त्यामुळे त्यांच्यावरही कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केली जाईल असे अजितदादा म्हणाले. राग सगळ्यांना येतो. त्याबद्दल दुमत नाही. परंतु, सार्वजनिक मालमत्तेच नुकसान जर कोणी करत असेल तर, तो पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, तर त्या पक्षाकडून ती सर्व वसुली झाली पाहिजे. अजितदादांच्या या विधानानंतर आता वसंत मोरेंसह ठाकरे गटावर कोणत्याप्रकारची कारवाईकेली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ajit Pawar स्वारगेट आगारात रोज बलात्कार – मोरे

स्वारगेट एसटी स्थानकामध्ये 20 सुरक्षा कर्मचारी आहेत मात्र हे 20 सुरक्षा कर्मचारी असताना देखील सुरक्षा केबिनच्या समोर उभ्या असलेल्या एसटीमध्ये बलात्कार होत असेल तर या सुरक्षा व्यवस्थेचा उपयोग काय? त्यामुळे आम्ही ही सुरक्षा केबिन फोडली असे स्पष्टीकरण वसंत मोरेंनी माध्यमांशी बोलताना दिला होता. तसेच यावेळी मोरे यांनी स्वारगेट एसटी आगाराच्या कडेला बंद असलेल्या एसटीमध्ये दारुच्या बाटल्या आणि कंडोमचा खच पडलेला असल्याचेही निदर्शनास आणून दिले. या सर्व गोष्टींना येथील प्रशासन व्यवस्था आणि सुरक्षा रक्षक जबाबदार आहे. त्यामुळे कठोरातील कठोर कारवाई या सर्वांवर झाली पाहिजे अशी मागणीदेखील मोरेंनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img