राज्यात विरोधी पक्षनेत्याच्या पदावर ठाकरे गटाचा आमदार विराजमान होणार तर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार आहे. मात्र आमदार संख्येच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या पदांपासून दूर राहणार आहे. त्यामुळे पक्षाचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी नव्या रणनितीचा अवलंब करत शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sharad Pawar महाविकास आघाडीमध्ये चलबिचल
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून स्थापन करणार असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये देखील याबद्दल दुमत निर्माण झाले आहे. शरद पवार यांच्या या खेळीमुळे ठाकरे गट आणि काँग्रेस (Congress Party) यांना देखील शह दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या तरी शरद पवार गटाकडे दोन्ही सभागृहांमध्ये विरोधीपक्षनेते पद न मिळाल्यामुळे आपले स्वतःचे व्यक्तिगत अस्तित्व सिद्ध करण्यासाठी शरद पवार यांनी ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.
विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर आमचा दावा नाही तर हक्कच, राऊतांनी स्पष्टच सांगितले
महायुती सरकारमध्ये प्रभावी विरोधी पक्ष उभा राहण्यासाठी आवश्यक असणारी आमदार संख्या महाविकास आघाडीच्या कोणत्याच पक्षाकडे नाही. तरीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विरोधी पक्षनेतेपद मान्य करण्यास सकारात्मकता दाखवली आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून संख्याबळाच्या आधारे विरोधी आवाज दडपला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी शाडो कॅबिनेट मंत्रिमंडळ स्थापन करून ठाकरे गट आणि काँग्रेसवरही राजकीय दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून अप्रत्यक्ष सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. त्याच वेळी ठाकरे सेना आणि काँग्रेसमध्ये नाराजी असल्याने काही आमदार सत्ताधारी महायुतीत जाण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत शरद पवार गट शाडो कॅबिनेटच्या माध्यमातून आपले वेगळेपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.
याआधी २०२२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) असाच प्रयोग केला होता. मात्र, त्यानंतर या कॅबिनेटचे कोणतेही ठोस कार्य पुढे आले नाही अशी टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली होती. त्यामुळे आता शरद पवारांच्या या नव्या प्रयोगाला सत्ताधाऱ्यांचा आणि जनतेचा किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.