12.2 C
New York

Uddhav thackeray : या ‘नरेटिव्ह’चे बाप कोण? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

Published:

सिंधुदुर्गातील एकूण 9 सेतू सुविधा केंद्र चालविण्यासाठी गुजराती कंपनीकडे सोपवण्यात आल्याबाबत उद्धव ठाकरे
(Uddhav thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्र आणि मराठी भाषेचे बरेच गोडवे पंतप्रधानांनी गायले. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असेही ते म्हणाले. प्रत्यक्षात मात्र ‘महाराष्ट्रातील उद्योग घटवावा आणि गुजरातचा वाढवावा’ असेच दिल्लीतील केंद्र सरकारचे धोरण आहे. कालपर्यंत महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळविले गेले. आता गुजरातची ही घुसखोरी थेट राज्य सरकारी सेवांपर्यंत येऊन पोहोचली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांचे हे गुजरातप्रेम कोणी चव्हाट्यावर आणले तर विद्यमान मुख्यमंत्री त्याला ‘फेक नरेटिव्ह’ म्हणून मोकळे होतात. मग आता सिंधुदुर्गातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ तुमच्याच सरकारने थेट गुजराती कंपनीला चालवायला दिली आहेत, यावर तुमचे काय म्हणणे आहे, या ‘नरेटिव्ह’चे बाप कोण असा सवाल ठाकरेंनी फडणवीसांना विचारला आहे. (uddhav thackeray slams cm devendra fadnavis over sindhudurg aaple sarkar contract)

“महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय गुजरातमध्ये पळविण्याचे सत्र दहा वर्षांपासून सुरूच आहे. आता राज्य सरकारी सेवादेखील गुजरातच्या घशात घालण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. योजना सुरू करायच्या महाराष्ट्रातील भूमिपुत्रांच्या नावाने, परंतु वेळ आली की त्यांच्या तोंडचा घास काढून तो गुजराती कंपन्यांच्या घशात कोंबायचा, हे उद्योग थांबण्याची चिन्हे नाहीत. ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अर्थात सेतू सुविधा केंद्राबाबत हेच घडले आहे,” असे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाल्मिक कराडसह 8 आरोपींविरोधात CID दाखल करणार 1400 पानी चार्जशीट

महाराष्ट्रातील सध्याच्या राज्यकर्त्यांचे धोरण महाराष्ट्राऐवजी ‘गुजरात फर्स्ट’ असे आहे. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले अनेक मोठे उद्योग राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या ‘नाकाखालून’ दिल्लीकरांनी गुजरातला पळवून नेले, असे म्हणताना ठाकरेंनी या उद्योगांची यादीच दिली आहे. वेदांत-फॉक्सकॉन, टाटा एअरबस सी-295, ड्रग पार्क असे मोठे प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये उभारले जात आहेत. मुंबईचा हिरे उद्योग सुरतला नेण्याचा प्रयत्न झाला. मुंबईचे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरातला नेण्यात आले. कर्जतमधील पारले बिस्कीट कंपनीचे युनिटही गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला गेला आहे. टाटा एअरबस हा प्रकल्प तर विदर्भात होणार होता, पण मोदी सरकारने विदर्भाच्या ताटातील गुजरातच्या ताटात ओढून घेतले. राज्यातील लाचार राज्यकर्ते फक्त पाहत बसले,” अशी टीका ठाकरेंच्या पक्षाने केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img