पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर (Swargate) एका 26 वर्षीय महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली असून यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. याच प्रकरणावरुन नगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी गृह खात्यावर निशाणा साधला आहे.
महिला सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पुण्यातील घटना घडून एवढा वेळ झाला मात्र तरी देखील अद्याप आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी एका मंत्र्यांचा मुलाला अवघ्या काही तासांमध्ये शोधले जाते तर एवढी भयानक घटना पुण्यात घडलेली असताना आरोपीला पकडण्यात आलेले नाही. यामुळे हे राज्य सरकारचं दुर्दैव आहे. अशी टीका खासदार निलेश लंके यांनी केली.
पुढे बोलताना खासदार लंके म्हणाले की, या गोष्टीला खऱ्या अर्थाने गृह खात कमी पडते आहे. राज्यात दर दिवसाला कितीतरी घटना घडत आहे. गृह खात्यांचा यावर अंकुशच राहिलेला नाही आहे अशा शब्दात नगरचे खासदार निलेश लंके यांनी गृहखात्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
Nilesh Lanke प्रकरण काय?
परवा पहाटे 5.30 च्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे अत्याचाराची घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटण्याच्या दिशेने जात होती. बससाठी ती स्वारगेट बस स्थानकावर थांबली असता आरोपी दत्तात्रय गाडे तिकडे आला आणि पीडित तरुणीला स्वारगेट आगारात मधोमध उभी असलेली बस फलटणला जाणार आहे असं सांगितलं. उभी असणारी बस सोलापुरला जाणार आहे आणि मधे बस फलटणला थांबणार आहे. असं त्याने पिडितेला सांगितले. यावेळी तो पीडित तरुणीला ताई- ताई म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बस जवळ आली मात्र बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच बस काही वेळात फलटणला निघेल असं आरोपीने तरुणीला सांगितलं.
त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे देखील चढला आणि बस बंद केली. त्यानंतर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आणि तिकडून पळ काढला. तरुणी घाबरल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलं नाही. त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली आणि तिने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला.