राज्यातील तापमानाचा पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान (Heat Wave) विभागाकडून काही दिवसांपूर्वी व्यक्त करण्यात आला होता. तर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये म्हणजेच मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार आता राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानाच्या पाऱ्यात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर ज्या सहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्या जिल्ह्यातील तापमानाचा पारा हा 38 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. ज्यामुळे नागरिकांना फेब्रुवारीतच मे महिन्याचा उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. परंतु, येत्या तीन दिवसांमध्ये या तापमानातही वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Weather Temperature rises May heats up in February)
बुधवारी (ता. 26 फेब्रुवारी) राज्यातील बहुतेक भागांमध्ये तापमानाचा पारा वाढलेला पाहायला मिळाला. मराठवाड्यातील तापमानात वाढ झाली असून मध्य महाराष्ट्रातही सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात येत्या 24 तासांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस ही तापमानस्थिती कायम राहणार आहे. राज्याच्या उर्वरित भागात सध्या कोरडे व शुष्क हवामान असून प्रचंड तापमान वाढले आहे. तर, राज्यभरात तापमानाचा पारा प्रचंड वाढणारा असला तरी कोकण आणि गोव्याच्या तापमानात फारसा बदल होणार नसल्याची माहिती सुद्धा हवामान खात्याकडून देण्यात आली.
राज्यात बुधवारी अनेक भागांमध्ये 30 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली. पुण्यात शिवाजीनगर येथे 36.2 अंश तर लोणावळ्यात 37.6 अंश तापमान नोंदवले गेले. पण साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी कमाल तापमान 27.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, कोल्हापूर 32 अंश आणि सांगलीमध्ये 35 अंश तापमान नोंदविण्यात आले. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सुद्धा फेब्रुवारी महिन्यातच मे महिन्यासारखे उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. तसेच, नंदुरबारच्या शाहादा येथे सर्वाधिक 39.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यातील बहुतांश भागांत तापमान 33 ते 37 अंश सेल्सिअसदरम्यान होते.
Heat Wave जाणून घ्या तापमानाचा पारा…
धुळे – 36.5 अंश सेल्सिअस
जळगाव – 33 अंश सेल्सिअस
नाशिक – 36 अंश सेल्सिअस
लातूर – 36.1 अंश सेल्सिअस
नांदेड 34.9 अंश सेल्सिअस
जालना 33.5 अंश सेल्सिअस