स्वारगेट बसस्थानक, पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण. हजारो बस, लाखो प्रवाशी रोज स्वारगेट बसस्थानकात येतात. पण, मंगळवारी सकाळी 5.30 ते 6 च्या दरम्यान घडलेल्या घटनेने पुण्यासह राज्याला एकच हादरा बसला. एका 26 वर्षीय तरूणीवर सराईत गुन्हेगाराने शिवशाही बसमध्ये अत्याचार केला. या घटनेनंतर स्वारगेट बसस्थानकाची सुरक्षा वेशीवर लटकली असल्याचे समोर आले आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काही काळ सोडला, तर पुण्याचे पालक राहिले आणि सध्याही आहेत. एकीकडे 50 कोटींचा खर्च करून अजितदादांनी (Ajit Pawar) बारामतीचे बसस्थानक चकाचक केले आहे. त्याच अजितदादांचे स्वारगेट बसस्थानकाकडे दुर्लक्ष आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
Ajit Pawar सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दुरवस्था
स्वारगेट बसस्थानकात बलात्काराचे प्रकरण घडल्यानंतर तेथील विदारक चित्र समोर आले आहे. स्वारगेट बसस्थानकात सुरक्षा रक्षक नेमले आहेत. पण, त्यांचे सुरक्षेकडे लक्ष नाही. बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यातील काही कॅमेरांची दुरवस्था झाली आहे. स्थानकातील रस्ते निट नाहीत. फलाटावर, स्वच्छतागृहांमध्ये दुर्गंधी पसरली आहे.
Ajit Pawar बसस्थानकाच्या बाहेर कुठेही रिक्षा थांबवतात
बसस्थानकातील अधिकाऱ्यांची सुद्धा मुजोरी पाहायला मिळते. अधिकाऱ्यांकडून प्रवाशांना निट उत्तर दिली जात नाहीत. बसस्थानकाच्या परिसरात खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी फुटपाथवर अतिक्रमणाने विळखा घातला आहे. बसस्थानकाच्या बाहेर रिक्षा स्थानक आहे. पण, स्थानकाच्या परिसरात कुठेही रिक्षा थांबवण्यात येतात. पोलिसांकडून मात्र बसस्थानकांच्या बाहेर दुचाकी चालकांवर कारवाई करून ‘मलई’ खाण्याचा प्रयत्न असतो.
Ajit Pawar अजितदादा 14 वर्षेपुण्याचे पालक
आता पुण्याचे पालकत्त्व हे अजितदादा पवार यांच्याकडे आहे. 2004 ते 2025 या कार्यकाळात अजितदादा हे 14 वर्षे पुण्याचे पालकमंत्री राहिले आहेत. सध्याही पुण्याचे पालकमंत्रिपद अजितदादांकडेच आहे. यात काही काळ भाजपकडे पुण्याचे पालकमंत्रिपद होते. पण, 14 वर्षांत अजितदादांनी स्वारगेट बसस्थानकाकच्या सुधाराकडे किती लक्ष दिले हाही प्रश्न आहेच. अलीकडे अर्थात 12 फेब्रुवारीला अजितदादांनी स्वारगेट येथे, ‘अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यासाठी कार्यवाही करा,’ असा आदेश दिल्याचे ऐकीवात आहे.
Ajit Pawar भाजपचे आमदार, खासदार, पण…
परंतु, 14 वर्षे पालकमंत्री असताना अजितदादांनी स्वारगेट बसस्थानकाचा कायापालट का केला नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हाच प्रश्न सहा वर्षे पुण्याचे पालकमंत्री राहिलेल्या भाजपलाही लागू होतो. पुण्यात भाजपचे आमदार, खासदार आहेत; त्यांना स्वारगेट बसस्थानकाची दुरावस्था दिसत नाही का? ऑडी, मर्सिडिज, बीएमडब्लूसारख्या लक्झरी कारमधून फिरणाऱ्या नेत्यांना जनतेचे दु:ख माहिती असणार?
Ajit Pawar पालक म्हणून अजितदादांनी लक्ष द्यायला हवे
दुसरीकडे… बारामतीत अजितदादांनी 50 कोटी रूपये खर्च करून एअरपोर्टला साजेशे असे भव्य अद्ययावत बसस्थानक उभारले आहे. अजितदादा बारामतीच्या बसस्थानकाची अनेकदा स्तुती करत असतात. बारामतीच्या बसस्थानकावर एकाच वेळी 22 बसेस फलाटावर उभ्या राहू शकतात. बारामतीच्या बसस्थानकाबद्दल आक्षेप नाहीच. मात्र, स्वारगेट बसस्थानकावरून मोठ्या प्रमाणातून बस जातात, तेवढ्याच बस येतात. किमान लाखभर प्रवाशी दररोज स्वारगेट बसस्थानकावरून प्रवास करतात. अशा बसस्थानकाकडे अजितदादांनी पालक म्हणून लक्ष द्यायला हवे, असे मत जनतेतून मांडले जात आहे.
Ajit Pawar 100 फुटांवर पोलीस ठाणे पण सुरक्षेकडे दुर्लक्ष
स्वारगेट बसस्थानकाच्या जवळच 100 फुटांवर स्वारगेट पोलीस स्टेशन आहे. पण, स्वारगेट बसस्थानकाच्या परिसरात पाकीटमार, सराईत गुंड, मद्यपी यांचा हौदोस आहे. स्वारगेट परिसरात 7,196 कारवाया पोलिसांकडून करण्यात आल्या, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. त्यात अधिक ट्रॅफिकच्याबाबत असल्याचे योगेश कदम यांनी म्हटले. म्हणजे गुंडांवर कारवाई केली नाही, असेही नाही, असे कदम यांनी स्पष्ट केले. परंतु, पोलिसांनी सर्वाधिक कारवाया ट्रॅफिकबाबत म्हणजेत ‘मलई’ मिळणाऱ्या ठिकाणीच केल्याचे कदम यांनी सांगितले.
Ajit Pawar पुणे महापालिकेचे हातगाड्यांकडे दुर्लक्ष
स्वारगेट बसस्थानकाच्या बाहेर फूथपाथवर खाद्यपदार्थाच्या हातगाड्या लागल्या आहेत. अनेकदा पुणे पालिकेने कारवाई केली आहे. पण, परत खाद्यपदार्थाच्या गाड्या तिथे लागतात. हातगाडीवाल्यांवर राजकीय नेत्यांचा की पालिकेच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे? त्यामुळे पालिका दुर्लक्ष करते का? असा सवाल उपस्थित होत आहे.