17.4 C
New York

Nashik Trimbakeshwar Simhastha 2027 : मुख्यमंत्र्यांनी घेतली कुंभमेळा बैठक, प्रयागराजनंतर नाशिकमध्ये गर्दीचे रेकॉर्ड मोडणार

Published:

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभात देशातीलच नाही तर जगभरातील भाविकांनी स्नान केले. गर्दीचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघालेच नाही तर इतक्या मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन हा जगभरात चर्चेचा विषय ठरला. आता त्याच धरतीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी फडणवीस सरकारने आतापासूनच कंबर कसली आहे. कुंभमेळ्यात अप्रिय घटना घडल्या. त्या घटना टाळण्याचे मोठे आवाहन सरकारसमोर आहे. व्यवस्थापनाचा नवा आदर्श घालून देण्याची मोठी संधी महायुती सरकारला आहे. योगी सरकारला जे जमलं नाही ते करून दाखवण्याची आयती संधी सिंहस्थमुळे सरकारला मिळत आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

Nashik Trimbakeshwar Simhastha 2027 मुख्यमंत्र्यांनी घेतली कुंभमेळा बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कुंभमेळा बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभ २०२७ (Nashik Trimbakeshwar Simhastha 2027) हाय-टेक करण्यासाठी AI-चालित गर्दी व्यवस्थापन आणि सर्व्हिलन्सवर भर देण्यात येणार आहे. सर्व यंत्रणांमध्ये सुव्यवस्थित समन्वयासाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण स्थापन होणार आहे.

Nashik Trimbakeshwar Simhastha 2027 गर्दी व्यवस्थापनासाठी मोठी कसरत

प्रयागराज महाकुंभच्या धर्तीवर गर्दीच्या व्यवस्थापनासाठी आणि अप्रिय घटना घडू नये यासाठी ४-५ पट तयारी करण्यात आली आहे. सिंहस्थ महाकुंभ 2027 मध्ये होईल. महाकुंभ भव्य दिव्य करण्यासाठी दोन वर्षांपासूनच नियोजन करण्यात येत आहे. या सिंहस्थमुळे नाशिक जगाच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न होत आहे.

त्यासाठी नाशिक-त्र्यंबक रस्ता २४ मीटरपर्यंत रुंद करण्यात येत आहे

रस्त्याच्या कडेला टेंट सिटी उभारण्यात येणार आहे

गोदावरी नदीकाठच्या विकासासाठी ड्रोन सर्वेक्षण

प्रत्येक ३ मिनिटांनी भाविकांसाठी ई-बस सेवा उपलब्ध

शिर्डी आणि ओझर विमानतळ सुविधा वाढण्यात येणार आहे

नाशिकमध्ये हेलिपॅड तयार करण्याचा विचार करण्यात येणार आहे

नाशिक रोड, इगतपुरी आणि कसारा रेल्वे स्थानकांवर सुविधा वाढवणार

त्र्यंबकेश्वर, शिर्डी, शनिशिंगणापूर जोडणारा धार्मिक कॉरिडॉर तयार होणार

त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त कुंडाचे सौंदर्यीकरणावर भर तर अतिक्रमण हटवणार

गर्दी व्यवस्थापनासाठी इंटरॅक्टिव्ह डिजिटल डिस्प्ले बोर्ड

गोदावरी नदीत स्नानासाठी स्वच्छ पाण्याचा प्रवाह सुनिश्चित करण्यात येणार आहे

आरोग्य केंद्रे, अग्निशमन आणि सार्वजनिक घोषणा प्रणाली सज्ज

कर्मचार्‍यांसाठी तंत्रज्ञान-आधारित गर्दी व्यवस्थापन प्रशिक्षण

सिंहस्थ कुंभ २०२७ साठी अधिकृत लोगो स्पर्धा जाहीर होईल

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img