11.5 C
New York

Maharashtra Politics : शिंदेंना मोठा धक्का; भाजपने दिल्लीतून सूत्रं फिरवली, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला

Published:

नाशिकच्या (Nashik) पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटल्याचं समोर आलंय. नाशिकचं पालकमंत्रिपद हे भाजपकडेच (BJP) राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. मागील अनेक दिवसांपासून नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांवरून मोठी रस्सीखेंच सुरू होती. या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली (Maharashtra Politics) होती. त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना (Eknath Shinde) दोन्ही पालकमंत्री पदासाठी अडून बसल्याचं दिसून आलं होतं.

पालकमंत्रिपदाचा हा तिढा सुटणार कधी? हाच प्रश्नांवर सर्वांसमोर होता. अखेर नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्याचं दिसतंय. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार आहे, मात्र रायगडचा तिढा अजून कायम आहे, अशी माहिती भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांनी दिलीय. नाशिकचं पालकमंत्रिपद हे गिरीश महाजन यांच्याकडेच देण्यात आलंय. मात्र रायगडच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न कायम आहे. तो रायगडचा तिढा उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि अजित पवारांनी एकत्र बसून सोडवावा, असे आदेश दिल्लीतून देण्यात आलेत.

मागील काही दिवसांपासून पालकमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. 18 जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री पदाची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्याचं समोर आलं होतं. या स्थगितीमुळे शिंदे गटाचे नेते नाराज असल्याचं देखील समोर आलं होतं.

दरम्यान 26 फेब्रुवारी रोजी भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. त्यांनी पालकमंत्री पदाचा तिढा दोन दिवसांमध्ये, सुटेल असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने तसा स्पष्ट संदेश देखील दिला आहे. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन होणार असल्याचं निश्चित मानलं जातंय. परंतु रायगडचा तिढा मात्र कायमच आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img