9.1 C
New York

Crime News : पुणे हादरलं! गजबजलेल्या स्वारगेट आगारात 26 वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार

Published:

पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे, (Crime News ) शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. स्वारगेट एसटी बस स्टँडमध्ये अभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पहाटे अंधाराचा फायदा घेत नराधमाने महिलेवर बलात्कार केल्याचे सांगितले जात आहे. पीडित तरूणीला पुढील उपचारांसाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरूणी पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकात पुण्याहून फलटनकडे जाण्यासाठी आली होती. त्यावेळी संबंधित तरूणी फलाट क्रमांक 22 वर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये जाऊन बसली. त्यावेळी आरोपीने तरूणीला बाजूला उभी असलेली बस फलटनला जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पीडित तरूणी बाजूला उभ्या असलेल्या बसमध्ये जाऊन बसली. त्याचवेळी बसमधील लाईट बंद होते. याचाच फायदा घेत आरोपीने तरूणीवर अतिप्रसंग केला. सध्या पोलीस या नराधमाचा शोध घेत असून, आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे आणि सध्या जामीनावर बाहेर असल्याचे सांगितले जात आहे.

Crime News सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांसह सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात नेहमी गजबजलेल्या स्वारगेट स्थानकात फलाटावर उभ्या असलेल्या बसमध्ये तरूणीवर बलात्कार झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीच्या शोधासाठी 12 पथकं रवाना करण्यात आली आहेत.

Crime News अशा घटना खपवून घेणार नाही – मोहोळ

घटलेल्या घटनेवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, स्वारगेट बस स्थानकात बलात्कार झाल्याची बातमी आता समजली त्यानंतर मी पोलीस आयुक्तांना फोन केला आणि लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याच्या सूचना दिल्या अलून, माझ्या शहरात असा घटना खपवून घेणार नसल्याचेही मोहोळ यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img