9.1 C
New York

Donald Trump : 50 लाख डॉलर्स द्या अन् अमेरिकचे नागरिक व्हा…डोनाल्ड ट्रम्पची ‘खास’ योजना

Published:

अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या अॅक्टीव्ह मोडमध्ये आहेत. त्यांनी एकीकडे घुसखोरांना हाकलवून लावण्याची मोहिम सुरू केलीय. तर दुसरीकडे ट्रम्प (Donald Trump) यांनी आणखी एक घोषणा केली. अमेरिकेत लवकरच गोल्ड कार्ड (US Gold Card) विकले जाऊ शकतात, यामुळे श्रीमंत व्यावसायिकांना अमेरिकेत स्थलांतरित होण्याच्या संधी उपलब्ध होतील. यामध्ये रशियन श्रीमंत लोकांचाही समावेश असल्याचं सांगितलं जातंय.

अमेरिकन नागरिकत्व मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक योजना आखली आहे. ट्रम्प यांनी काल गोल्ड कार्ड योजनेची घोषणा केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 50 लाख डॉलर्स (Donald Trump Gold Card) खर्च करावे लागतील. या योजनेतून स्थलांतरितांना कोणते फायदे मिळतील, ते आपण जाणून घेऊ या.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 25 फेब्रुवारी रोजी एक नवीन ‘गोल्ड कार्ड’ योजना जाहीर केलीय. यामुळे स्थलांतरितांना अमेरिकन नागरिकत्व मिळविण्यास मदत होणार आङे. हे गोल्ड कार्ड ग्रीन कार्डचे प्रीमियम व्हर्जन (Donald Trump News) असेल, ते केवळ ग्रीन कार्डचे विशेष अधिकार प्रदान करणार नाही तर श्रीमंत स्थलांतरितांना अमेरिकेत गुंतवणूक करण्याची आणि नागरिकत्व मिळविण्याची संधी देखील प्रदान करणार आहे.

आम्ही एक गोल्ड कार्ड विकणार आहोत. तुमच्याकडे ग्रीन कार्ड आहे, ते गोल्ड कार्ड आहे. त्याची किंमत सुमारे 5 दशलक्ष असणार आहे. ते तुम्हाला ग्रीन कार्डसारखे विशेष अधिकार देते, असं ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांच्यासोबत कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करताना सांगितलं. ते पुढे म्हणाले, यामुळे नागरिकत्वाचा एक नवीन मार्ग उघडेल. श्रीमंत लोक हे कार्ड खरेदी करतील आणि अमेरिकेत येतील, येथे गुंतवणूक करतील आणि भरपूर नोकऱ्या निर्माण करतील.

ट्रम्प यांनी घोषणा केली की, ही योजना पुढील 2 आठवड्यात सुरू होईल. ‘गोल्ड कार्ड’च्या बदल्यात मिळणारे पैसे थेट अमेरिकन सरकारला दिले जाणार आहेत. ट्रम्प म्हणाले की, आम्ही EB-5 कार्यक्रम संपवणार आहोत. त्याऐवजी ट्रम्प गोल्ड कार्ड आणणार आहोत. या योजनेअंतर्गत, स्थलांतरितांना जागतिक दर्जाचे नागरिक असल्याची खात्री करण्यासाठी 5 दशलक्ष डॉलर्स देऊन अमेरिकन सरकारकडून तपासणी प्रक्रियेपासून वाचता येईल. ट्रम्प म्हणाले की, गोल्ड कार्ड योजनेद्वारे उभारलेले पैसे अमेरिकेची वित्तीय तूट कमी करण्यासाठी वापरले जातील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img