मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती. या हत्येला 76 दिवसांचा कालावधी उलटूनही ठोस असे काही हाती आलेले नाही. प्रत्येकवेळी आंदोलन, जनरेट्यानंतरच सरकार जागे झाल्याचे दिसून आले. आता या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा देण्यासह इतर सात मागण्यांसाठी ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाच्या दुसर्या दिवशी सातपैकी एक मागणी पूर्ण झाली आहे. उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी त्यावर अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ग्रामस्थांना मोठे आवाहन केले आहे.
Ujjwal Nikam काय म्हणाले उज्ज्वल निकम?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटद्वारे उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याची माहिती दिली. याविषयी निकम यांनी प्रतिक्रिया दिली. ‘हे प्रकरण घडल्यानंतर काही दिवसातच मुख्यमंत्र्यांनी मला विनंती केली होती की, आपण या खटल्याचं कामकाज बघावं पण त्यांना मी नम्रपणाने काही कारणास्तव नकार दिला होता. त्याची कारणं देखील त्यांना विषद करून सांगितली होती. पुन्हा कालपासून मी ग्रामस्थांचा जो अन्न त्यागाचा त्यांनी आंदोलन केलं आहे ते बघून व्यथीत झालो. माझ्या नियुक्तीसाठी आणि इतर काही मागण्यासाठी त्यांनी उपोषणाला बसावं ही निश्चित चांगली गोष्ट नाही. त्यांचा विश्वास सरकारवर आहे. मुख्यमंत्री आणि माझ्यावरती आहे. मुख्यमंत्र्यांशी काल मी बोललो आणि सदर खटला चालवण्यासाठी माझी संमती त्यांना कळवली. त्याप्रमाणे त्यांनी नियुक्तीचे आदेश काढण्याचा आज आपल्याकडूनच मला कळलं आहे.”, अशी प्रतिक्रिया निकम यांनी दिली.
Ujjwal Nikam ग्रामस्थांना केले मोठे आवाहन
“मी ग्रामस्थांना एक आश्वासित करू इच्छितो कायदा या जगात देशात मोठा आहे. आणि कायदा मोठा असल्यामुळे न्याय प्रत्येकाला मिळतोच. म्हणून माझं त्यांना आवाहन आहे की त्यांनी उपोषणाचा मार्ग सोडावा. निश्चितपणे यावेळी केव्हा आरोप पत्र दाखल होईल त्यावेळेला हा खटला जलद गतीने चालविण्यात येईल.” असे आश्वासन त्यांनी दिले.
Ujjwal Nikam देशमुख कुटुंबियांची काय प्रतिक्रिया
जशी त्यांनी आमची एक मागणी पूर्ण केली तशा पुढच्या मागण्या सुद्धा पूर्ण केला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करते, असे वैभवी देशमुख म्हणाली. तर गावकऱ्यांनी काहीतरी आंदोलन केलं किंवा देशमुख कुटुंबियांनी पाऊल उचल तर या न्यायाचा लढा पुढे सक्रिय झाल्या सारखा वाटत. आंदोलन केल्याचे मागणी पूर्ण होते हा योगायोग आहे की कोण घडवून आणतय हेच कळत नाही. आज त्यांनी एक मागणी पूर्ण केले आहे आम्हाला कुठेतरी वाटतं की ते आमच्या मागण्या पूर्ण करतील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती स्वागतार्ह आहे, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे, असे वक्तव्य धनंजय देशमुख यांनी केले.