5.6 C
New York

Latest News Updates : राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर…

Published:

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अतिवृष्टीचे 137 कोटी रुपये जमा

धाराशिव जिल्ह्यात 2024 च्या एप्रिल महिण्यात झालेला आवकाळी पाऊस आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामध्ये बाधित 1 लाख 6 हजार 500 शेतकऱ्यांच्या खात्यावर 137 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तर बाकी बाधित असलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधी यांनी केले आहे.

प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात भाविकांची अलोट गर्दी..

महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी परळी मध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.. मध्यरात्रीपासून भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे.. भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागत आहेत..

पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांची धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या सुरुवातीच्या काळातील तपासा बाबतच्या मागण्यावर मसाजोग ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत.. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून या आंदोलनास प्रारंभ होताच केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील हे आंदोलन स्थळे पोहोचले असून ते धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करत आहेत.. देशमुख कुटुंब तसेच ग्रामस्थांच्या मागण्याबाबत आज काही ठोस निर्णय होऊ शकतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे..

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 महाशिवरात्रीनिमित्त रायगडमध्ये शंकराच्या मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी

महाशिवरात्रीच्या निमित्ताने रायगडमध्ये आज शंकराच्या मंदिरात मोठी गर्दी झालेली पहायला मिळत आहे. पहाटेपासूनच अभिषेक विधीवत पूजन सुरु करण्यात आला आहे. महाड शहरातील शिवकालीन वीरेश्वर मंदिरात आजपासून छबिना उत्सव म्हणजेच जत्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img