6.9 C
New York

Pratap Sarnaik : एसटी प्रवासात महिलांना सवलत बंद होणार ? परिवहन मंत्र्यांचं स्पष्टीकरण

Published:

 विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती (Mahayuti) सरकारने एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सवलत आणि जेष्ठ नागरिकांना सवलत देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र, आता राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी या सवलतीमुळे एसटी तोट्यात जात असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर लवकरच महायुती सरकार एसटी प्रवासात महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना देणारी सवलत बंद करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. आता या सगळ्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

एसटी महामंडळाच्याबाबत मुख्यमंत्री म्हणुन कार्यरत असताना एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी जे काही निर्णय घेतले आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या योजनेत कोणताही बदल करण्यात येणार नाही अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. महिलांना एसटीच्या प्रवास तिकिटामध्ये अर्धी सूट देण्यात आली आहे, त्यामध्ये महिलांना अर्ध्या तिकिटाच्या दरात राज्यभरात कुठेही प्रवास करता येतो.

Govind- Sunita Divorce : ३७ वर्षाचा संसार मोडणार ? अभिनेता गोविंदा घेणार घटस्फोट

दुसरीकडे वय वर्ष 65 वर्षांवरील नागरिकांना देखील प्रवास दरात अर्धी सूट मिळते, तर ज्यांचं वय हे 75 वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा स्त्री व पुरुषांना राज्यभरात कुठेही एसटीनं मोफत प्रवास करता येतो. तसेच विद्यार्थ्यांना देखील रोजच्या प्रवासासाठी एसटीकडून पासच्या स्वरुपात मोठी सवलत देण्यात येते.मात्र एसटी तोट्यात असल्यामुळे मोफत प्रवासाची योजना बंद होणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे, यावर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया देत, मोफत प्रवासाचा निर्णय बंद होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img