6.9 C
New York

Ladki Bahin Yojna : आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार !

Published:

महाराष्ट्रातील महिलाना लाभ मिळण्यासाठी महायुती सरकारने लाडक्या महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू केली. पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होतात. मात्र, फेब्रुवारी महिना संपत आला तरी देखील या महिन्याने पैसे न मिळाल्याने महिलांसह विरोधकांकडून टीका होत आहे. आज अखेर महायुती सरकारनं सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3500 कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला दिली होती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये आजपासून मिळणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभाग विभागानं दिली आहे. अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग झाली आहे. काही तांत्रिक बाबींमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती देखील विभागाकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img