इतिहास अभ्यासक आणि संशोधक इंद्रजित सावंत(Indrajit Sawant) यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati sambhaji maharaj)इतिहासाबाबत केलेल्या मांडणीवरुन त्यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार आता समोर आला आहे. शिवीगाळ करत तुम्हाला घरात घुसून मारु, अशी धमकी त्यांना देण्यात आली आहे. डॉ. प्रशांत कोरटकर (Prashant koratkar) नावाच्या ब्राह्मण व्यक्तीने इतिहासकार इंद्रजित सावंत(Indrajit Sawant) यांना फोनवरुन धमकी दिल्याची माहिती समोर आली. यानंतर या व्यक्तीने आपण इंद्रजित सावंत(Indrajit Sawant) यांना धमकी दिल्याचा आरोप फेटाळून लावला. माझ्या नावाने कोणीतरी खोडसाळपणा केला असावा, असे डॉ. कोरटकर यांनी म्हटले आहे. मात्र, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना देण्यात आलेल्या धमकीचे प्रकरण आता राज्याच्या गृहखात्याने गांभीर्याने घेतले असल्याचे समजले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. त्यासोबतच इंद्रजित सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणातील कारवाईला वेग येणार असल्याचे दिसत आहे. प्रशांत कोरटकर यांनी त्यांनी फोन केल्याचे नाकारल्यामुळे इंद्रजित सावंत यांना फोन करुन धमकी देणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे.
प्रसिद्ध इतिहासकार संशोधक इंद्रजित सावंत(Indrajit Sawant) यांना मुख्यमंत्र्यांचं नाव वापरून देण्यात आलेली धमकी ही निषेधार्ह आहे. सावंत यांनी इतिहास संशोधनात केलेलं कार्य महाराष्ट्र आणि येणाऱ्या पिढीसाठी खूप मोलाचं आहे. त्यात कोण तो प्रशांत कोरटकर नामक व्यक्ती सत्तेचा आधार घेऊन सावंत यांना धमक्या देत असेल, तर आम्ही ते कदापि सहन करून घेणार नाही. महाराष्ट्रात नेहमीच विचारवंत, संशोधक आणि इतिहासकार यांना आदराचे स्थान राहिलेलं आहे. परंतु एका खास हेतूने पुरोगामी विचारवंतांवर हल्ले करण्याची मानसिकता महाराष्ट्रासाठी शोभणारी नाही. पुरोगामी विचारवंतांवर यापूर्वी देखील झालेले जीवघेणे हल्ले पाहता इंद्रजित सावंत यांना सरकारने तातडीने पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी आणि धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, ही विनंती. अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व आमदार रोहित पवार(Rohit Pawar)यांनी केली आहे.
Govind- Sunita Divorce : ३७ वर्षाचा संसार मोडणार ? अभिनेता गोविंदा घेणार घटस्फोट
इंद्रजित सावंत यांनी काल त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन त्यांना आलेल्या फोन कॉलच्या संभाषणाची ऑडिओ क्लीप पोस्ट केली. यामध्ये एक व्यक्ती इंद्रजित सावंत यांना धमकावत आहे. “तुम्ही कोल्हापूरात जिथे असाल तिथे लक्षात ठेवा, ब्राह्मणांची ताकद कमी लेखू नका. तुम्हाला हा महाराष्ट्र मराठमोळा वाटत असेल पण ब्राह्मणांची काय ताकद होती, ते शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात बघा. तुम्ही जास्त बोलू नका. एक दिवस तुम्हाला ब्राह्मणांची औकात दाखवून देऊ. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालाजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता. नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता तुम्हाला काही माहिती नसतं पडलं. बाबासाहेब पुरंदरे ब्राह्मण होता. तुम्हाला ब्राह्मणांविषयी इतका द्वेष आहे. ब्राह्मणांना काही बोललात तर घरात घुसून मारू, अशी धमकी देत व अगदी खालच्या व घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत संबंधित व्यक्तीने इंद्रजित सावंत यांना फोन केला होता. इंद्रजित सावंत यांनी ही क्लीप सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत.