6.9 C
New York

Actor Santosh Nalawade Passes Away:’लागीर झालं जी’ फेम ‘या’अभिनेत्याचा मृत्यू

Published:

‘लाखात एक आमचा दादा’,’अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता संतोष नलावडे (SantoshNalawade) यांचे आज अपघाती निधन झाले. या बातमीने कलाविश्वात शोककळा परसली आहे. अभिनेता संतोष हणमंत नलावडे हे 49 वर्षाचे होते. अवघ्या वयाच्या ४९ व्या वर्षी नांदेड येथे रस्ते अपघातात मृत्यू झाला.

संतोष नलावडे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रेकॉर्ड विभागामध्ये कार्यरत होते. ते नांदेड येथे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गेले असता त्यांचा अपघात झाला आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र, त्या उपचारादरम्यान २४ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले.

Pune : संत निरंकारी मिशनने ओतूरचा मांडवी नदी परिसर केला स्वच्छ

हौशी नाटकांमधून संतोष नलावडे यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात केली. ‘अप्पी आमची कलेक्टर, शेतकरी नवरा हवा, लाखात एक आमचा दादा, मन झालं बाजींद, कॉन्स्टेबल मंजू, लागीर झालं जी ‘ या मालिकांमध्ये सुद्धा काम केलं होतं. सोबतच त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहकलाकार म्हणून काम केलंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img