‘उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की, एक पद मिळायचं’ असा आरोप मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी केलाय. यावर आता संजय राऊत (Sanjay Raut) संतापल्याचं समोर आलंय. अतिशय निर्लज्ज बाई… नमकहराम अशी घणाघाती टीका राऊतांनी केलीय.
यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अतिशय निर्जल्ल बाई आहे नमकहराम. दिल्लीमध्ये महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांवर चिखल फेकण्यासाठी साहित्य संमेलन भरवलं आहे का? हे जे साहित्य महामंडळ आहे, त्यांच्याकडे खंडण्या घेऊन संमेलन भरवत (Maharashtra Politics) आहेत. मराठी साहित्य महामंडळ म्हणजे सरकारने दोन कोटी रुपये दिले की, 25 लाख खंडणी म्हणून काढून घ्यायचे आणि संमेलन भरवायला परवानगी द्यायचे काम करतात, कार्यक्रम ठरवतात हे महामंडळ आणि आयोजक जे असतात ते सतरंज्या उचलायला असतात, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
मराठी भाषेवरती राजकारणावरती कार्यक्रम ठरवणार. नीलम गोऱ्हे यांच कालचं वक्तव्य ही त्यांची विकृती आहे. ते म्हणाले की, मला आठवतंय बाळासाहेब ठाकरे बोलले होते, ही बाई कोण आणली तुम्ही पक्षामध्ये? कुठलं ध्यान आणलंय पक्षात? काही लोकांच्या मर्जी खातीर त्या आल्या. गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून गेल्या. त्या बाईंचं कर्तृत्व काय? विधान परिषदेतला हे जर समजून घ्यायचं असेल तर पुण्यात महानगरपालिकेत आमचे गटनेते होते अशोक हरनाळे त्यांची मुलाखत घ्या, त्यांच्याकडून धमक्या देऊन जेव्हा पुण्याचं प्लानिंग डीपी सुरू होतं, तेव्हा कोणाकोणाच्या नावावर या बाईने कोट्यावधी रुपये गोळा केले, गटनेते अशोक हरनाळे यांची मुलाखत घ्या, मग हे मर्सडीज प्रकरण काय आहे, ते त्यांना कळेल असं देखील संजय राऊत म्हणालेत.
नाशिकला माजी महापौर आणि शिवसेनेचे स्थानिक नेते विनायक पांडे यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यासाठी या बाईने किती पैसे घेतले होते? हे त्यांनाच विचारा. तुम्ही कोणावर थुंकत आहात मातोश्रीवर? तुमची लायकी नसताना चार वेळा आमदार झाल्या, काय तुमचं कर्तुत्व होतं? एक संस्कार संस्कृती असते. आम्ही गेलो सोडून गेलो. काही कारणं असतील तुमची. अशा प्रकारे विधान करताना मातोश्रींबाबत शिवसेना पक्षप्रमुखांच्या बाबतीत ज्यांनी तुम्हाला चार वेळा आमदार केलं, त्याबद्दल विचार करायला हवा.
महाराष्ट्राने या बा वरती हक्क भंग आणला पाहिजे, विश्वास घातकी बाई असल्याचा आरोप त्यांनी केलाय. काल नीलम गोऱ्हे या बाहेर पडताना पत्रकारांशी बोलताना म्हटलंय मी, महामंडळाला 50 लाख दिले. लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात हे देखील त्यांना विचारा. प्रश्न विचारायला माझ्याकडे सर्व माहिती पुराव्यासहित आहे, असा दावा संजय राऊतांनी केलाय.