गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात अनेक (Weather Update) ठिकाणी तापमानात चढउतार पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी अवकाळीने हजेरी लावली तर काही ठिकाणी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. राज्यातील बहुतांश भागात हवामानामध्ये अनेक बदल दिसून आले आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवत आहे. तर, मुंबईसह राज्यातील 5 जिल्ह्यांना तापमानाचे तीव्र इशारे देण्यात आले आहेत. तसेच, देशभरातही वातावरणामध्ये अनेक बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंडसहित अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. (Weather Update in Mumbai and kokan IMD Weather alert)
राज्यात आता पावसाची शक्यता ओसरली आहे. तसेच, पुढील 5 दिवस कोरडे हवामान राहणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये आगामी 4 दिवसामध्ये तापमान 36 ते 38 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता वर्तवली आहे. कमालीची वाढ कोकणातही किमान तसेच कमाल तापमानात झाली असून 2-3 अंशांनी येत्या 3 दिवसांत कमाल तापमानात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, विदर्भामध्ये येत्या तीन दिवसांत तापमान वाढतच राहणार असून त्यानंतर तापमान 2-4 अंश सेल्सियसने वाढणार आहे. तसेच, सिंधुर्दुगाच्या दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी तिलारी भागात अवकाळी वादळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला. तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस पाहायला मिळाला.
प्रादेशिक हवामान विभागाने राज्यामध्ये मुंबई, पालघरसह कोकण पट्ट्यात तीव्र हवामानाचे इशारे दिले आहेत. 5 जिल्ह्यांना उष्ण आणि आर्द्र हवामानाचे यलो अलर्ट देण्यात आले आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तीव्र तापमान बदलामुळे नागरिकांना उष्णतेच्या चटक्यासह आर्द्र हवामानामुळे उकाड्याला सामोरे जावे लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यातच राज्यामधील बहुतांश भागांत उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामधील जिल्ह्यांत उष्णतेचा प्रभाव अधिक आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुणे विभागाचे हवामान विभागाचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी ट्विटरवर पोस्ट करत अंदाज वर्तविला.