कोट्यवधी पीएफ (EPFO) ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांना पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी जास्त विचार करावा लागणार नाही. ते UPI द्वारे पीएफचे पैसे काढू शकतात. सरकार अशी प्रणाली तयार करण्यावर काम करतंय, ज्याद्वारे सदस्यांना UPI प्लॅटफॉर्मच्या मदतीने निधी सहजपणे हस्तांतरित करता येणार आहे. ईपीएफओने या संदर्भात एक ब्लूप्रिंट तयार केल्याची माहिती मिळतेय. पुढील 2 ते 3 महिन्यांत यूपीआय प्लॅटफॉर्मवर ते सुरू करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी चर्चा सुरू आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ग्राहकांना युनायटेड पेमेंट इंटरफेस (UPI) प्रणाली वापरून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) दाव्यांवर प्रक्रिया करण्यास आणि सहज पैसे हस्तांतरण प्राप्त करण्यास सक्षम करण्यासाठी काम करत आहे, असं समोर आलंय. एकदा ईपीएफ यूपीआयशी जोडला गेला की, वापरकर्त्यांना डिजिटल वॉलेटद्वारे त्यांच्या दाव्याची रक्कम सहज उपलब्ध होईल, असा अहवाल एफईने दिलाय.
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कोणी केली? कोल्हेंनी थेट पुरावेच आणले
पीएफओ आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी हे पाऊल उचलत आहे. ईपीएफ यूपीआयशी एकात्मिक झाल्यामुळे, ग्राहक त्यांच्या पीएफ खात्यातून डिजिटल वॉलेटद्वारे पैसे काढू शकतात. कामगार मंत्रालय व्यावसायिक बँका आणि आरबीआय यांच्या सहकार्याने ईपीएफओच्या डिजिटल प्रणालींमध्ये परिवर्तन करण्यासाठी काम करत आहे. पैसे काढण्याची प्रक्रिया सोपी करणे आणि वापरकर्त्याचा अनुभव सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या सदस्यांसाठी ही सुविधा खूप सोयीची ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि वापरकर्त्यांचा अनुभव वाढवण्यासाठी, कामगार मंत्रालय आरबीआय आणि व्यावसायिक बँकांच्या भागीदारीत ईपीएफओच्या डिजिटल प्रणाली आणत आहे. ईपीएफ यूपीआयशी जोडला गेल्यानंतर ग्राहकांना डिजिटल वॉलेटद्वारे त्यांच्या दाव्याची रक्कम सहज उपलब्ध होणार आहे.
कामगार सचिव सुमिता डावरा यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जाहीर केल्याप्रमाणे, पुढील वर्षापासून ईपीएफओ सदस्यांना त्यांचे भविष्य निर्वाह निधी थेट एटीएममधून काढता येणार आहे. त्यांनी म्हटलंय की, आम्ही दावे जलदगतीने निकाली काढत आहोत. ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी काम करत आहोत. दावेदार, लाभार्थी किंवा विमाधारक व्यक्ती यांना कमीत कमी मानवी हस्तक्षेपासह एटीएमद्वारे त्यांचे क्लेम सोयीस्करपणे मिळू शकतील