ईडीने ‘बीबीसी इंडिया’ला ठोठावला ३.४४ कोटींचा दंड
नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बीबीसी इंडियाला ३.४४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारने डिजिटल माध्यमसंस्थांमधील परकी गुंतवणुकीवर २६ टक्के एवढी मर्यादा घातली असतानाही ‘बीबीसी इंडिया’ आणि त्यांच्या संचालकांनी या नियमांचे पालन केले नाही, असा ठपका ठेवण्यात आला आहे.
राज्यात उन्हाचा तडाखा कायम, पारा ३६ अंशांच्या पार
राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका वाढल्याने तापमानाचा पारा ३६ अंशांच्या वर आहे.
काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे ३८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
आजपासून उन्हाचा चटका कायम राहण्यासह, राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यता आहे.
उद्या तुरळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज आहे.
सोलापूर येथे ३८.१ अंश तापमान नोंदले गेले.कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका अधिक आहे. सांताक्रूझ,सांगली, जेऊर, ब्रह्मपुरी, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली,वर्धा येथे पारा ३६ अंशांच्या पार होता.
उत्तर महाराष्ट्रात मात्र गारठा कायम असून, काल निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने, उकाड्यातील वाढीने घाम निघत आहे.
आज उत्तर महाराष्ट्राच्या किमान तापमानात १ ते २ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात तापमानातील वाढ कायम राहण्याचा, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पीएम किसानचा हप्ता सोमवारी मिळणार; केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती
नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान योजनेचा निधी येत्या सोमवारी (ता. २४) शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केला जाणार आहे. बिहारमधील भागलपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा निधी वर्ग केला जाणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी सांगितले.
पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडोशी धामणदेव गावाच्या परिसरातील डोंगराला भीषण आग
पुण्याच्या भोर तालुक्यातील हिरडोशी धामणदेव गावाच्या परिसरातील डोंगराला भीषण वणवा
लागलेल्या वणव्यात, डोंगरातील वनसंपत्तीच मोठं नुकसान,
परिसरातील शेतीसह शेतीसाठीच्या पाईपलाईनचंही झालं नुकसानं