-4.8 C
New York

SSC Exam : पेपर सुरू होताच प्रश्नपत्रिका केंद्राच्या बाहेर; जालना जिल्ह्यात दहावीचा पेपर फुटल्याने खळबळ

Published:

दहावीच्या परिक्षेला आजपासून सुरूवात झाली आहे. अशातच पेपरफुटीची घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे दहावीच्या मराठी पेपर फुटला आहे. (SSC Exam) पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूर मध्ये समोर आला आहे. यामुळे आता खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यामध्ये शुक्रवारपासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झाली आहे. शुक्रवारी मराठीचा पहिला पेपर होता. सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे दहावीच्या मराठीची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आली.

या घटनेनंतर बदनापूर येथील झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स मारून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता बोर्ड दहावीचा पेपर रद्द करणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आजपासून (०१ मार्च २०२४) दहावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. राज्यभरात १६ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र अशातच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img