महाकुंभमध्ये (mahakumbh) जवळपास 3 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. श्रद्धा आणि अर्थव्यवस्थेचा अद्भुत संगम याठिकाणी पाहायला मिळाला. महाकुंभ भारतातील सर्वात मोठा आर्थिक आयोजन म्हणून उदयास येत आहे. महाकुंभमुळे स्थानिक व्यवसायाला देखील चालना मिळाली आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांच्या माहितीनुसार, फक्त प्रयागराजच नाही तर, 150 किलोमीटर परिसरात देखील व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. आयोध्या, वाराणसी, आणि अन्या धार्मिक स्थळांच्या अर्थव्यवस्थेत देखील मोठी वाढ झाली आहे. महाकुंभ श्रद्धा आणि अर्थव्यवस्थेचा गहन संबंध दाखवत आहे.
जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक कार्यक्रम असलेल्या महाकुंभने व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या मते, यावेळी महाकुंभने 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. सीएआयटीचे सरचिटणीस आणि खासदार प्रवीण खंडेलवाल म्हणाले, हा कार्यक्रम श्रद्धा आणि अर्थव्यवस्था यांच्यातील खोल संबंध दर्शवतो.
13 जानेवारी 26 जानेवारी पर्यंत प्रयागराजमध्ये महाकुंभचं आयोजन करण्यात आलं आहे. खंडेलवाल म्हणाले, ‘सुरुवातीच्या अंदाजानुसार 40 कोटी भाविक येण्याची आणि 2 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याची शक्यता होती, मात्र देशभरात या महाकुंभसाठी अभूतपूर्व उत्साह असल्याने एकूण व्यवसाय 3 लाख कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे…. 60 कोटी भाविकांच्या आगमनामुळे महाकुंभाच्या काळात अनेक व्यावसायिक क्षेत्रात मोठी आर्थिक तेजी दिसून आली. यामध्ये प्रामुख्याने पर्यटन, हॉटेल, निवास सेवा, अन्न आणि पेय उद्योग, वाहतूक, लॉजिस्टिक, पूजा साहित्य, धार्मिक कपडे, हस्तकला, आरोग्य सेवा, आरोग्य सेवा, मीडिया, जाहिरात, मनोरंजन उद्योग, स्मार्ट तंत्रज्ञान, CCTV-टेलिकॉम आणि AI आधारित सेवांचा समावेश आहे.
Mahakumbh यूपी सरकारने महाकुंभमध्ये केलीये 7500 कोटींची गुंतवणूक
यूपी सरकारने महाकुंभमध्ये पायाभूत सुविधांवर 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. महाकुंभ यशस्वी करण्यासाठी, उत्तर प्रदेश सरकारने प्रयागराजमधील रस्ते, उड्डाणपूल आणि इतर सुविधांवर 7500 कोटी रुपये खर्च केले. यामधील 1500 कोटी रुपये विशेषत: महाकुंभच्या व्यवस्थेसाठी खर्च करण्यात आले. यामुळे केवळ प्रयागराजमध्येच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातही वाहतूक आणि नागरी सुविधांमध्ये सुधारणा झाली आहे.