-4.8 C
New York

Sharad Pawar : ‘एक मत मिळवलं अन् वाजपेयींचं सरकार पाडलं..’, शरद पवारांनी पहिल्यांदाचा केला खुलासा

Published:

केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीएचं सरकार फक्त एका मतानं पडलं होतं. या घटनेला आज उजाळा मिळण्याचं कारण म्हणजे वाजपेयी यांचं सरकार फक्त एका मतानं कसं पडलं याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. निमित्त होते निलेशकुमार कुलकर्णी लिखित संसद भवन ते सेंट्रल विस्टा : आठवणींचा कर्तव्यपथ या पु्स्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. शरद पवार यांनी आपल्या भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार फक्त एका मताच्या अभावाने कसे पडले त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा केला.

पवार म्हणाले, मी संसदेत विरोधी पक्षनेता होतो. त्यावेळी मी एक काम केलं. त्यावेळी केंद्रात वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकार होते. त्याच वेळी आम्ही या सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता. ठराव एकमताने मंजुरही झाला. ते एक मत मी मिळवलं होतं. कसं मिळवलं याबद्दल सांगत नाही. ठराव मांडला, ठरावावर चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर मतदान करण्यासाठी काही वेळ असतो त्यावेळी मी सभागृहातून बाहेर पडलो. काही वेळाने परत आलो. याच वेळी सत्ताधारी गटातील एका व्यक्तीने वेगळा निर्णय घेतला आणि एका मताने सरकार पडलं.

आताचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीमुळे फक्त एका मतामुळे वाजपेयी यांचं सरकार पडलं होतं. लोकसभेच्या सभापतींची यात मोठी भूमिका होती. त्यावेळी हे पद टीडीपीकडे होतं. 25 एप्रिल 1999 रोजी जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षाने वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढला होता. त्यानंतर विरोधकांनी या सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img