10.4 C
New York

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा 11 लाख कोटींवर डोळा.. भारताला तेल देण्याची अमेरिकेला घाई

Published:

भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी भागीदारी (India USA Relation) सातत्याने वाढत चालली आहे. आगामी काळात ही भागीदारी आणखी मजबूत होण्याची चिन्हे दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात (Donald Trump) झालेल्या बैठकीनंतर अशा चर्चा सुरू झाल्या आहेत की आगामी काळात भारत अमेरिकेकडूनही तेल खरेदी करू शकतो. सध्या भारत रशिया, सऊदी अरब या देशांकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे. परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांची नजर भारतीय बाजारावर आहे.

Donald Trump भारताचा तेल बाजार किती मोठा

भारताने अमेरिकेकडून खनिज तेल खरेदी करावे अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. खरं तर तब्बल 11 लाख कोटी रुपयांचे पेट्रोल आणि डिझेल भारत दरवर्षी दुसऱ्या देशांकडून खरेदी करत आहे. यानंतर तेल वापराबद्दल बोलायचे झाले तर चीन आणि अमेरिकेनंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचे 80 टक्के तेल दुसऱ्या देशांकडून येते. अशा परिस्थितीत तेल संपन्न देशांना वाटते की भारताने त्यांच्याकडूनच तेल खरेदी करावी.

Donald Trump अमेरिकेकडून भारताला किती तेल

सन 2024 या वर्षात भारताने सर्वाधिक कच्चे तेल रशियाकडून (Russia) खरेदी केले. यानंतर इराक, सऊदी अरब, यूएई, अमेरिका आणि कुवैत या देशांचा नंबर आहे. मागील वर्षांत भारताने अमेरिकेकडून फक्त 6.9 बिलियन डॉलर्सचे कच्चे तेल आयात केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांना वाटते की हा आकडा पूर्णपणे बदलला पाहिजे. विशेष म्हणजे भारतात कच्चे तेल कुठून खरेदी करायचे याचा निर्णय सरकारी तेल कंपन्या आणि खासगी कंपन्या घेतात.

अशा परिस्थितीत जर अमेरिकेने चांगली ऑफर दिली तर फायदा विचारात घेऊन भारत अमेरिकेकडून सुद्धा तेल खरेदी करू शकतो. परंतु अमेरिकेकडून तेल खरेदी करण्यासाठी भारताला काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपये सातत्याने कमजोर होत आहे. अशात जर भविष्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणतीही सवलत दिली नाही तर भारताचा व्यापार तोटा अधिकच वाढत जाईल.

Donald Trump 50 अब्ज डॉलर्सचा तोटा

जर भारताला अडचणी येत असतील तर डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा भारताशी व्यवहार करताना अडचणी येतील. सध्याच्या परिस्थितीत भारत आणि अमेरिका यांच्यात 50 अब्ज डॉलर्सचा व्यापार तोटा आहे. 2023 मध्ये भारत अमेरिका माल आणि सेवा व्यापार जवळपास 190.1 अब्ज डॉलर्स इतका होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार अमेरिकेच्या निर्यातीचे मूल्य साधारण 70 अब्ज डॉलर्स राहिले तर भारताकडून अमेरिकेने 120 अब्ज डॉलर्स इतकी आयात केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img